रशियात घुसखोरीसाठी जिहादी सज्ज

रशियात घुसखोरीसाठी जिहादी सज्ज

दोन दशकांपासून अफगाणिस्तान आधी अमेरिका विरुद्ध तालिबानी, नंतर अफगाणी विरुद्ध तालिबानी आणि आता अफगाणिस्तानमध्ये गृहयुद्ध ही समस्या डोकं वर काढू लागली आहे. तालिबान्यांच्या राज्यात अफगाणिस्तानात दहशतवाद्यांना रान मोकळं मिळालं आहे. येथे शेजारच्या देशांना निशाणा बनवण्यासाठी १० हजार जिहादी सीमांवर तैनात आहेत.

पूर्व सोविएत देशांमध्ये प्रवेश करण्यासाठी हे जिहादी तयार आहेत. या देशांमध्ये बहुसंख्य मुसलमान लोकसंख्या असून या देशांमध्ये इस्लामिक दहशतवादाने पाळंमुळं रोवल्यास रशियामध्ये अस्थिरता होण्याची शक्यता आहे.तालिबान्यांना जे हवं होतं ते मिळाल्यामुळं अफगाणिस्तानात आता शांतता निर्माण होईल असं वाटत होतं. अमेरिकासुद्धा अफगाणिस्तानातून निघून गेल्यानं युद्धाची स्थिती नसेल असं वाटत होतं. पण अफगाणिस्तानातच आता गृहयुद्धाची ठिणगी पडण्याची भीती आहे.

अफगाणिस्तान व मध्य आशियाई देशांच्या सीमेवर आयएसआयएसचे दहशतवादी असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच आयएसआयएसचे १० हजार दहशतवादी रशियाच्या सीमेवर असल्याची माहिती रशियाने दिली आहे. या आयएसआयएसच्या दहशतवाद्यांचा ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानमध्ये घुसखोरी करण्याचा डाव आहे, असे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे या बातम्या समोर येत असताना रशियानं देखील ताजिकिस्तानला ३० अत्याधुनिक रणगाडे पाठवल्याचं सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा:

संजय राऊतांचे अग्रलेख म्हणजे तालिबानी प्रवृत्तीचे उदाहरण

अभिमानास्पद! भारतात लसीकरणाचा ‘अमृत महोत्सव’

हसन मुश्रीफ आणि कुटुंबियांनी असे केले शेकडो कोटींचे घोटाळे

देशात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट, केरळमध्ये मात्र भयावह स्थिती

आयएसआयएसला रशिया आपला सर्वात मोठा दुश्मन वाटतो. इराकच्या या इसिसचं नामोनिशाण मिटवण्यासाठी रशियानं सीरियात अनेक हवाई हल्ले केलेले आहेत. आता ताजिकिस्तानाच्या सीमेवर इसिसचे १० हजार दहशतवादी गोळा झालेले आहेत. रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे हे दहशतवादी रशियामध्येही घुसू शकतात अशी पुतीन यांना चिंता आहे. रशियातल्या चेचेन्या भागात आयएसआयएसचे दहशतवादी घुसखोरी करण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे रशियाने ताजिकिस्तानला ३० अत्याधुनिक रणगाडे पाठवले आहेत.

Exit mobile version