भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत मिळविले दुसरे सुवर्ण

भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत मिळविले दुसरे सुवर्ण

संकेत सरगरने रौप्यपदक मिळवून दिल्यानंतर आणि नंतर मिराबाई चानूने भारताला पहिले सुवर्ण जिंकून दिल्यानंतर आता राष्ट्रकूल स्पर्धेत १९ वर्षीय वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगाने सुवर्णपदक पटकावले आहे. भारताचे हे दुसरे सुवर्ण.

जेरेमी लालरिनुंगाने मधल्या सामान्यात दुखापत होऊनही हार मानली नाही आणि पुरूषांच्या 67 किलो वजनी गटात सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले आहे. सांगलीच्या संकेत सरगरबरोबर असेच झाले होते. दुखापत होऊन देखील त्याने शेवटपर्यंत सुवर्णपदक मिळवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली पण त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. पण ही कसर जेरेमीनी भरून काढली आणि भारताच्या नावावर दुसरे सुवर्ण आणि एकूण पाचवे पदक करून देण्याची मोलाची कामगिरी बजावली आहे.

जेरेमीने स्नॅचमध्ये १४० किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये १६० किलो वजन उचलले. अशाप्रकारे त्याने एकूण ३०० किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. सामोआच्या वायवापा आयोने (२९३ किलो) रौप्यपदक जिंकले. मिझोरामच्या जेरेमीने स्नॅचमध्ये पहिल्याच प्रयत्नात १३६ किलो वजन उचलले आणि सुवर्णपदक पटकावले. दुस-या प्रयत्नात त्याने १४० किलो वजन उचलून आपले स्थान भक्कम केले आहे आणि खेळाचा विक्रम केला आहे. जेरेमीने १४३ किलो वजनाचा तिसरा प्रयत्न केला. मात्र यामध्ये त्यांना यश मिळाले नाही.

भारतीय वेटलिफ्टरने क्लीन अँड जर्कमध्ये पहिल्या प्रयत्नात १५४ किलो तर दुसऱ्या प्रयत्नात १६० किलो वजन उचलले. तिसऱ्या प्रयत्नात त्याने १६४ किलो वजनाचा प्रयत्न केला. मात्र यश मिळाले नाही. मात्र, असे असतानाही त्याने सुवर्ण जिंकले. पहिल्या क्लीन अँड जर्कच्या प्रयत्नात जेरेमी जखमी झाला. असे असूनही तो आणखी दोनवेळा त्याने उचलण्याचा प्रयत्न केला. जेरेमी लालरिनुंगा २०१८ च्या युवा ऑलिंपिकमधील सुवर्णपदक विजेता आहे. यासोबतच त्याने २०२१ च्या राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले.

हे ही वाचा:

“संजय राऊत यांच्यावर होत असलेल्या कारवाईने आनंद”

“आमची सकाळ खराब करणाऱ्यांची सकाळ खराब होत असताना पाहून समाधान वाटतंय”

संजय राऊत ईडीचणीत

तिस्ता सेटलवाड आणि श्रीकुमार यांना दिलासा नाहीच

बॉक्सिंग: निखत जरीनचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

हैदराबादच्या निखत जरीनने ५० किलोग्रॅम महिला बॉक्सिंगच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्याने आरएससी अंतर्गत मोझांबिकच्या हलिना स्माईल बागोचा १६ व्या फेरीच्या सामन्यात पराभव केला. जेव्हा एखादा बॉक्सर लढाई दरम्यान अस्थिर होतो, तेव्हा रेफरी बॉक्सिंग थांबवतो आणि दुसऱ्याला विजेता घोषित करतो.

पदकतालिकेत भारत सहाव्या स्थानावर
देश                  सुवर्ण      रौप्य        कांस्य        एकूण
ऑस्ट्रेलिया          १३           ८            ११           ३२
न्यूझीलँड            ७           ४            २१             ३
इंग्लंड               ५           १२           ४             २१
स्कॉटलँड           २            ४            ६            १२
भारत               २            २            १             ५
मलेशिया           २            ०             १             ३
नायजेरिया         १            ०              १             २
बर्म्युडा             १            ०              ०              १

Exit mobile version