‘भारत श्री’ किताबाचे मानकरी ‘विजू पेणकर’ यांना जीवन गौरव पुरस्कार

विचारे प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर

‘भारत श्री’ किताबाचे मानकरी ‘विजू पेणकर’ यांना जीवन गौरव पुरस्कार

कै. मनोहर विचारे प्रतिष्ठान, मुंबई यांच्यातर्फे क्रीडा क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यां व्यक्तींना ‘मराठी गौरव पुरस्काराने’ सन्मानित करण्यात येते. कोरोनामुळे २०२२, २०२३ या वर्षींचे पुरस्कार दिले गेले नव्हते. त्या दोन वर्षांच्या पुरस्कारांची घोषणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय विचारे यानी केली आहे. बुजुर्ग राष्ट्रीय कब्बडीपटू आणि महाराष्ट्राचे पहिले “भारत श्री” किताबाचे मानकरी असलेल्या ‘विजू पेणकर’ यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. इतर पुरस्कार विजेत्यांमध्ये विश्वविजेता मल्लखांबपटू दीपक शिंदे , ठाण्याच्या महिला क्रिकेट पंच, सामनाधिकारी वर्षा नागरे, , विश्वविजेता शरीरसौष्ठव सागर कातुर्डे, आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू मिलिंद पूर्णपात्रे , जेष्ठ कब्बडीपटू प्रशिक्षक शशिकांत कोरगावकर आणि लीला कोरगावकर, आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टर मनाली साळवी, आणि जेष्ठ क्रीडा संघटक मनोहर साळवी आदींचा समावेश आहे. तर आदर्श संस्था म्हणून ठाण्याच्या प्रख्यात ‘श्री मावळी मंडळाचा’ गौरव करण्यात येणार आहे.

आज १९ मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजता सीएसटी येथील मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहांत या पुरस्कारांचा वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. भारतीय खो-खो संघाचे प्रशिक्षक नरेंद्र कुंदर आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू रघुनंदन गोखले आणि भारतीय खेळ प्राधिकरणाचे प्रादेशिक निर्देशक पांडुरंग चाटे (आयआरएस) या मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तर स्व.बाळकृष्ण तुकाराम साळवी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

भास्कर जाधवांना राष्ट्रवादीचे वेध लागलेत का?

5G नंतर आता 6G ची तयारी, भारताने घेतले १००पेटंट

‘मिलेट्सचे’ यश ही भारताची जबाबदारी

कांदिवलीत महारोजगार मेळाव्याने दिल्या नोकऱ्या आणि घसघशीत पगार

कोण आहेत पुरस्कार विजेते?
‘भारत श्री ‘किताब विजेते विजू पेणकर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय महिला क्रिकेट पंच आणि सामनाधिकारी वर्षा नागरे, आंतरराष्ट्रीय मल्लखांबपटू दीपक शिंदे, आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव पटू सागर कातुर्डे, खो-खो क्रीडा संघटक मनोहर साळवी, आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू मिलिंद पूर्णपात्रे , आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टर मनाली साळवी, जेष्ठ कब्बडीपटू आणि प्रशिक्षक शशिकांत कोरगावकर , लीला कोरगावकर , आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू मार्क धर्माई, राष्ट्रीय तायक्वांदो खेळाडू श्वेता खिळे, जेष्ठ छायाचित्रकार मोहन बने, दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचे कार्यक्रम अधिकारी राजेश दळवी, आंतरराष्ट्रीय युवा टेबल टेनिस पटू पटू दिया चितळे, आंतरराष्ट्रीय महिला बुद्धिबळपटू वृषाली देवधर आणि आदर्श संस्था म्हणून ठाण्याच्या श्री मावळी मंडळ यांचा सुद्धा या कार्यक्रमांत गौरव करण्यात येणार आहे.

Exit mobile version