जनता दलाचे नेते कैलाश महतो यांची गोळी झाडून हत्या

जमिनीच्या वादातून हत्या झाल्याचा कयास

जनता दलाचे नेते कैलाश महतो यांची गोळी झाडून हत्या

संयुक्त जनता दलाचे नेते कैलाश महतो यांची मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञान मारेकऱ्यांनी गुरुवारी रात्री उशिरा गोळ्या झाडून हत्या केली. बिहारमधील बरारी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कटिहार येथे भर बाजारात ही घटना घडली. ते ७० वर्षांचे होते. गुरुवारी रात्री महतो हे त्यांच्या निवासस्थानाजवळ असतानाच मोटारसायकलवरून आलेले दोन मारेकरी अचानक कृषी फार्म चौकाजवळ पोहोचले आणि त्यांनी महतो यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यांच्या पोटावर आणि डोक्यावर पाच गोळ्या झाडण्यात आल्याचे समजते.

एका जमिनीच्या वादातून त्यांची हत्या करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. याच वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काही दिवसांपूर्वीच पोलिस अधिक्षकांसह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पोलिस संरक्षणाची मागणी केली होती. कैलास ‘महातो यांना सामुदायिक आरोग्य केंद्र बरारी येथे नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

‘महातो यांच्यावर चार ते पाच गोळ्या झाडण्यात आल्या असून या हत्येचा तपास सुरू करण्यात आला आहे. लवकरच मारेकऱ्यांना अटक केली जाईल. याबाबतची अधिक माहिती शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच मिळेल,’ असे स्थानिक पोलिस ओम प्रकाश यांनी सांगितले.

हे ही वाचा:

अलास्कामध्ये लष्कराची दोन हेलिकॉप्टर हवेत धडकली, तीन सैनिकांचा मृत्यू

शारजाच्या तुरुंगात क्रिसन परेराला केस धुण्यासाठी वापरावा लागला डिटर्जंट

आंतरजातीय विवाहाच्या विरोधातून पित्याने मुलीसह पत्नीवर काढला राग

‘द केरळ स्टोरी’ : हिंदू, ख्रिश्चन मुलींना दहशतवादी बनवण्याचा हृदयद्रावक प्रवास

शवविच्छेदनानंतरच विस्तृत माहिती समजेल
स्थानिक नागरिकांनी सांगितल्यानुसार, महतो यांच्यावर अनेक गोळ्या झाडण्यात आल्या. त्यामधील दोन ते तीन गोळ्या त्यांना लागल्या. महातो ठार झाल्याची खात्री पटल्यानंतर मारेकरी हवेत गोळीबार करून पसार झाले. स्थानिक लोकांनी लगेचच महतो यांना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रुग्णालयाचे डॉक्टर डॉ. रंजित कुमार यांनी सांगितले की, महतो यांना जबर जखमी अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यांच्या हृदयाखाली दोन गोळ्या लागल्याच्या खुणा आहेत. मात्र त्यांना नेमक्या किती गोळ्या लागल्या हे शवविच्छेदनानंतरच समजेल.

Exit mobile version