‘फोर्ब्स’ने अमेरिकेतील सर्वाधिक श्रीमंत १०० अमेरिकी महिलांची यादी जाहीर केली असून त्यात भारतीय वंशाच्या जयश्री उल्लाल, इंद्रा नुई, नीरजा सेठी आणि नेहा नारखडे या महिलांचा समावेश झाला आहे. यांची एकूण संपत्ती अब्जावधी डॉलरच्या घरात आहे. चारही महिलांना अमेरिकेतील सर्वांत यशस्वी आंत्रप्रीन्यर, एग्झिक्युटिव्ह आणि एंटरटेनर या यादीमध्येही समाविष्ट केले आहे.
जयश्री उल्लाल या कम्प्युटर नेटवर्किंग फर्म अरिस्टा नेटवर्क्सच्या अध्यक्ष व सीईओ असून नीरजा सेठी आयटी व आऊटसोर्सिंग फर्म सिंटे व क्लाऊड कंपनी कॉन्फ्लुअंटच्या सह-संस्थापक आहेत. नेहा नरखेडे आणि पेप्सिकोच्या माजी अध्यक्ष इंद्रा नूयी यांनी फोर्ब्सच्या अमेरिकेतील सर्वात श्रीमंत ‘स्वत:च्या हिमतीवर यश मिळवलेल्या’ (सेल्फ मेड) महिलांच्या यादीतही स्थान मिळवले आहे.
हे ही वाचा:
चीनच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर?
विक्रम मोडत ‘बाईपण भारी देवा’ सिनेमाने एका दिवसात केली ‘एवढी’ कमाई
सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळावर २५ कोटीची सोन्याची पेस्ट जप्त
१९ बंगल्यांशेजारी ठाकरेंच्या आशीर्वादाने उभारलेल्या अनधिकृत रिसॉर्टवर हातोडा पडणार
शेअर बाजारातील तेजीमुळे या महिलांची एकूण संपत्ती १२४ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे. सिस्कोच्या, ६२ वर्षीय जयश्री उल्लाल २.४ अब्ज डॉलर संपत्तीसह या यादीत १५व्या स्थानावर आहेत. त्या सन २००८मध्ये कम्प्युटर नेटवर्किंग कंपनी अरिस्टा नेटवर्क्समध्ये सीईओ म्हणून रुजू झाल्या होत्या. त्यांची कंपनी ४.४ अब्ज डॉलरची उलाढाल करते.
६८ वर्षीय नीरजा सेठी ९९ कोटी डॉलर संपत्तीसह २५व्या क्रमांकावर राहिल्या. त्यांनी १९८०मध्ये आऊटसोर्सिंग फर्म सिंटेलची सह-स्थापना केली होती. तर सॉफ्टवेअर इंजिनीअरपासून ते आंत्रप्युनरपर्यंतचा पल्ला गाठणाऱ्या ३८ वर्षीय नेहा नारखेडे ५२ कोटी अमेरिकी डॉलर संपत्तीसह या यादीत ५० व्या क्रमांकावर आहेत. तर, ३५ कोटी अमेरिकी डॉलरच्या संपत्तीसह इंद्रा नुई या यादीत ७७व्या क्रमांकावर आहेत. त्या सध्या घोटाळ्याने ग्रस्त असलेल्या डुईश बँकेच्या विश्वस्त सल्लागार मंडळावर आहेत.