हिजाब वाद पेटवायला अल कायदाचे तेल?

हिजाब वाद पेटवायला अल कायदाचे तेल?

काही दिवसांपुर्वी कर्नाटक मधील हिजाबचे प्रकरण देशभर चांगलेच गाजले होते. पण आता या विषयाला एक नवीन वळण आलेले पाहायला मिळत आहे. अल कायदाचे प्रमुख असलेल्या जवाहिरी याने भारतातील हिजाब वादामध्ये तेल ओतण्याचे काम केले आहे. भारतातील हिजब प्रश्नाच्या संदर्भात मुसलमानांनी एकजूट दाखवली पाहिजे असे विधान अल कायदाच्या प्रमुखाने केले आहे. या संदर्भात त्याने एक व्हिडिओ संदेश प्रसिद्ध केला आहे.

जवाहिरीच्या या व्हिडिओमुळे तो मृत नसून जिवंत असल्याचेही सिद्ध झाले आहे. दोन वर्षांपूर्वी २०२० मध्ये जवाहिरी याचा नैसर्गिक मृत्यू झाल्याची बातमी पुढे आली होती. पण त्या बातमीची पुस्तकाचा करणारी कोणतीच ठोस माहिती नव्हती पण आता जवादी यांनी स्वतः व्हिडिओ प्रसिद्ध केल्यामुळे ही बातमी खोटी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे ही वाचा:

धक्कादायक! राज्यमंत्र्यांच्याच कॉलेजमध्ये मुलं पुस्तकात बघून लिहितायत उत्तरं

RRR १००० कोटींच्या उंबरठ्यावर! PK ला मागे टाकत रचला ‘हा’ विक्रम

अनिल देशमुखांना सीबीआयने घेतलं ताब्यात

संजय राऊत यांच्यासाठी शरद पवार भेटले नरेंद्र मोदींना

मंगळवार, ५ एप्रिल रोजी हा व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. अलकायदाचे मुखपत्र समजल्या जाणाऱ्या अस सहाब मिडिया या प्लॅटफॉर्मवरून हा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. एकूण नऊ मिनिटांचा हा व्हिडिओ आहे. ज्यामध्ये जवाहिरी कर्नाटक मधील मुस्लिम विद्यार्थिनी मुस्कान खान हिचे तोंडभरून कौतुक करत आहेत. हिजाब वाद सुरू असताना मुस्कान खान हिचा एक व्हिडिओ समोर आला होता. जेव्हा ती हिंदूत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांसमोर अल्ला हूं अकबरच्या घोषणा देताना दिसत होती. या व्हिडिओमध्ये मुस्कान ही पूर्णपणे त्यांमध्ये दिसत होती. तिच्या या कृतीचे जवाहिरी यांनी कौतुक केले आहे.

तिच्या या व्हिडिओमुळे आपण कविता लिहायला प्रेरित झाल्याचेही त्याने सांगितले. हिंदू भारताचे खरे चित्र जगासमोर आणण्यासाठी अल्ला दिला बक्षीस देवो असे जवाहीर याने म्हटले आहे. तर याच व्हिडिओमध्ये पुढे हिजाब वादाच्या विरोधात सर्व मुसलमानांनी एकत्र आले पाहिजे असे आवाहन केले आहे.

Exit mobile version