जॅवलिन एक प्रेमकथा…नीरज चोप्राच्या जाहिरातीचा धमाका

जॅवलिन एक प्रेमकथा…नीरज चोप्राच्या जाहिरातीचा धमाका

नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये अचूक भालाफेक करून सुवर्णपदक जिंकलं पण आता तो टीव्हीवर चाहत्यांची मने जिंकण्यासाठी अवतरला आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये पटकाविलेल्या पदकानंतर नीरजकडे आता जाहिरातदारांच्या रांगा लागू लागल्या आहेत. नुकत्याच जारी झालेल्या क्रेड या ऍपच्या जाहिरातीत नीरज चमकला आहे. क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी उपयोगी असलेल्या या ऍपच्या जाहिरातीत नीरजचा अभिनय आपल्याला पाहता येतो. पण काही खेळाडू अभिनय करताना थोडे बावचळून जातात. नीरजने मात्र आत्मविश्वासपूर्ण अभिनय केला आहे.

१९ सप्टेंबरपासून आयपीएलच्या उर्वरित सामन्यांना सुरुवात होत आहे आणि त्याआधी ही नवी जाहिरात टीव्हीवर दिसू लागली आहे. त्यात नीरज या ऍपचा प्रचार करतो. नीरजनेही ती जाहिरात सोशल मीडियावर शेअर केली आहे.

नीरजने केलेल्या या जाहिरातीत तो वेगवेगळ्या रूपात दाखविला आहे. कधी क्लर्क, कधी खेळाडू, कधी दिग्दर्शक, कधी मार्केटिंग मॅनेजर अशा वेगवेगळ्या रूपात तो डायलॉगबाजी करताना दिसतो. दिग्दर्शक म्हणतो तुझे मै स्टार बनाऊँगा नीरज आणि मेडल ले चुके सनम, नीरज हुआ मध्यम, जॅवलिन एक प्रेमकथा अशा चित्रपटांची नावेही तो जाहीर करतो. क्लर्क म्हणतो की, गोल्ड का भाव काफी बढ गया है, कार्डसाठी घरोघर जाणारा माणूस म्हणतो सी फॉर चोप्रा, सी फॉर कॅशबॅक. मार्केटिंग मॅनेजर भाला हातात घेऊन फळ्यावर ३६० डिग्री मार्केटिंग असे म्हणतो. शेवटी जॅवलिन (भाला) मेरी आँखो मे, जॅवलिन मेरी सांसो मे अशा गाण्याने जाहिरातीचा शेवट होतो.

४० सेकंदांची ही जाहिरात धमाल उडवते. नीरज चोप्राच्या अशा आणखी काही जाहिराती येत्या काळात येतील आणि तो घराघरात पोहोचेल.

Exit mobile version