जपानमधील एका प्राध्यापिकेने अनोखा शोध लावत चवीची अनुभूती देणाऱ्या टीव्ही स्क्रीन विकसित केली आहे. जपानच्या मीजी विद्यापीठातील प्राध्यापीका होमी मियाशिता यांनी एक प्रोटोटाइप टच टीव्ही स्क्रीन विकसीत केली आहे. त्यामुळे टीव्ही स्क्रीनवर विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या चवीची आभासी अनुभूती घेणे शक्य होणार आहे. ‘टेस्ट द टीव्ही’ (TTTV) असे या उपकरणाचे नाव असून यात १० विविध चवी असलेले कॅरोसेल आहे जे विशिष्ट खाद्यपदार्थाची चव तयार करण्यासाठी एकत्रितपणे स्प्रे करते.
होमी मियाशिता यांनी सांगितले की, कोविड- १९ च्या काळात या तंत्रज्ञानामुळे लोक बाहेरील जगाशी संपर्क साधण्याचा आणि संवाद साधू शकतील. लोकांना घरी असतानाही जगाच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या रेस्टॉरंटमधील जेवणाचा अनुभव मिळवता येऊ शकतो. मियाशिता या ३० विद्यार्थ्यांच्या टीमसोबत काम करतात. त्यांची टीम विविध प्रकारच्या स्वाद- चवी संबंधित उपकरणे तयार करण्याचे काम करते. गेल्या वर्षभरात कोरोना काळात त्यांनी स्वतः ‘टेस्ट द टीव्ही’ (TTTV) तयार केले आहे. हे एक उपकरण तयार करण्यासाठी जवळपास १ लाख येन एवढा खर्च येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
हे ही वाचा:
आनंद महिंद्रा म्हणतात, ती जीप मला द्या; मी बोलेरो देतो
चिमुरडी लेकरं गमावलेल्या पालकांवर शिवसेना नेत्यांची अरेरावी
ओमिक्रोन विरुद्धच्या लढाईसाठी मोदींची ‘पंचसूत्री’
ठाकरेंची एन्ट्री, राणेंचे ‘म्याव म्याव’
हे तंत्रज्ञान विकसीत करण्याबाबत काही कंपन्यांशी चर्चा सुरू असल्याची माहिती मियाशिता यांनी दिली. याबाबत मीजी विद्यापीठातील २२ वर्षीय विद्यार्थिनी युकीने पत्रकारांसाठी ‘टेस्ट द टीव्ही’ याचे प्रात्यक्षिक करुन माहिती दिली. मीजी विद्यापीठ हे जपानमधील टोकियो आणि कावासाकी येथील एक खासगी विद्यापीठ आहे.