जपानने बनवली जगातील पहिली विजेवर चालणारी मशीनगन

आवाजाच्या वेगापेक्षा सात पट अधिक वेग

जपानने बनवली जगातील पहिली विजेवर चालणारी मशीनगन

एकीकडे इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धाची ठिणगी उडालेली असताना दुसरीकडे जपानने संरक्षण क्षेत्रात नवी झेप घेतली आहे. जपानने इलेक्ट्रिक गन मशीनची घोषणा केली आहे. जपानी नौदलाने एएलटीए या संरक्षण संस्थेच्या सहकार्याने याची चाचणी केली असून ती यशस्वी ठरली आहे.

जपानमध्ये प्रथमच या रेलगनची चाचणी घेण्यात आल्याचा दावा एजन्सीने केला असून सी प्लेनमधून करण्यात येत असलेल्या या चाचणीचा व्हिडिओ ‘एएलटीए’ने ट्विटरवर पोस्ट केला आहे. ही बंदूक जमीन आणि समुद्र दोन्हीवर वापरले जाऊ शकते, असा जपानचा विश्वास आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेलगनमुळे जपानची संरक्षण क्षेत्रातील ताकद वाढणार आहे. जपान लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांवर काम करण्याच्या तयारीचा विचार करत आहे. अमेरिकेला अद्याप रेलगन बनवता आलेली नसली तरी, असे करून जपानने चीन आणि उत्तर कोरियासारख्या त्याच्या शत्रू देशांची झोप उडवली आहे.

हे ही वाचा:

पोर्तुगीजांनी तोडली होती एक हजार मंदिरे; गोवा सरकारने बनवला मास्टर प्लॅन

वकील सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड प्रकरणी तिघांना अटक

चेक प्रजासत्ताकमध्ये १० लाख डॉलरचा पाऊस!

बीड मध्ये दोन वेगवेगळ्या अपघातात १० जणांचा मृत्यू

इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेलगन ही कोणताही आवाज आपल्या कानापर्यंत ज्या वेगाने पोहोचतो त्यापेक्षा ती सात पट वेगाने काम करते. विशेष म्हणजे ही बंदूक लक्ष्य नष्ट करण्यासाठी विजेचा वापर करते. संरक्षण एजन्सी ‘एएलटीए’च्या मते, ही बंदूक २,२३० मिलीसेकंद वेगाने लक्ष्यावर हल्ला करते. अहवालानुसार, या रेलगन्स विशेष प्रकारच्या ट्रकमध्ये बसवल्या जातील. ज्या पद्धतीने हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे तयार केली जातात त्याप्रमाणेच ती दिसणार आहेत.

Exit mobile version