चिनी दबावाविरुद्ध अमेरिका-जपानची वज्रमूठ

चिनी दबावाविरुद्ध अमेरिका-जपानची वज्रमूठ

चीनने इंडो- पॅसिफिक भागात निर्माण केलेल्या दबावाचा सशक्तपणे सामना करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिका- जपान सहकार्याची घोषणा केली. त्यांनी या भागातील मुक्त व्यापारासाठी जपान आणि अमेरिका एकत्रितपणे काम करणार असल्याची ग्वाही दिली.

आज पंतप्रधान सुगा आणि मी आम्ही अमेरिका- जपान सहकार्य आणि एकत्रित सुरक्षा याबाबत ग्वाही दिली. आम्ही चीनमार्फत पूर्व चीनी समुद्र आणि दक्षिण चीनी समुद्र आणि उत्तर कोरिया यांबाबत निर्माण करण्यात आलेल्या आव्हानांचा एकत्रित सामना करण्यासाठी सहकार्य करण्याचे ठरवले आहे, जेणेमुळे इंडो- पॅसिफिक भागातील भविष्य सुरक्षित राहू शकेल.

असे बायडन यांनी पंतप्रधान सुगा यांच्याशी झालेल्या भेटीनंतर सांगितले.

आमची प्रत्यक्षा झालेली भेट ही आम्ही जपान आणि अमेरिकेच्या सहकार्याला देत असलेल्या महत्त्वाचे आणि त्यातील मुल्यांचे प्रतिक आहे.

असे देखील त्यांनी नंतर बोलताना सांगितले.

हे ही वाचा:

भगव्या कफनीने केला त्यांचा घात

न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील

प.बंगालमध्ये ‘जोरसे छाप, कमल छाप’….

टेस्लाने लवकरात लवकर भारतात उत्पादन सुरू करावे

चीन सध्या इंडो- पॅसिफिक भागात सातत्याने निर्माण करत असलेल्या दबावाच्या पार्श्वभूमीवर या देशांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. बायडन यांच्यामते अमेरिका आणि जपान या भागातील सशक्त लोकशाही राष्ट्र आहेत. त्यामुळे या भागातील कायदा आणि सुव्यवस्था, मानवी अधिकार यांसारख्या मुल्यांच्या रक्षणासाठी दोन्ही देश कटिबद्ध आहेत असेही त्यांनी सांगितले.

या भेटीमध्ये जपान आणि अमेरिका यांच्यातील सहकार्याची घोषणा त्यांनी केली, त्याबरोबरच आम्ही एकत्रितपणे या आव्हानांचा सामना करणार असल्याचे देखील सांगितले.

जो बायडन यांनी सत्ताग्रहण केल्यानंतर त्यांची झालेली ही पहिलीच प्रत्यक्ष भेट होती.

Exit mobile version