जळगावच्या केळ्यांची दुबईवारी

जळगावच्या केळ्यांची दुबईवारी

उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्या हा केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. जळगावच्या या केळ्यांना केवळ भारतातच नाही तर जागतिक पातळीवर खूप जास्त मागणी असते. जळगावची ही केळी नुकतीच दुबईला निर्यात करण्यात आली आहेत. भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही केळी भौगोलिक सांकेतांक (जीआय) प्राप्त केळी आहेत.

भौगोलिक सांकेतांक (जीआय) प्रमाणित कृषी उत्पादनांना परदेशात खूप जास्त मागणी आहेत. त्यामुळे भारत सरकारकडूनही या कृषी उत्पादनांच्या निर्यातीला मोठ्या प्रमाणात चालना दिली जात असते. यापैकी आता महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील जीआय प्रमाणित केळीच्या मालाची खेप दुबईला निर्यात करण्यात आली आहे.

हे ही वाचा :

शिवसेनेने आता सामना बंद करून बाबरनामा काढावा

शिवसेना भवनावर भाजपा युवा मोर्चाचा “फटकार मोर्चा”

शिवसेनेने दाखवली औरंगजेबी वृत्ती

राम मंदिर उभारणीत कोलदांडा घालणाऱ्या शिवसेनेला ‘फटकार’

जीआय प्रमाणित बावीस मेट्रिक टन केळी ही महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याचा भाग असलेल्या तांदळवाडी गावच्या प्रगतिशील शेतकर्‍यांकडून भारत सरकारने घेतली. २०१६ मध्ये, जळगाव केळीला जीआय प्रमाणीकरण मिळाले ज्याची निसर्गराजा कृषि विज्ञान केंद्र (केव्हीके) जळगाव येथे नोंदणी झाली. जागतिक दर्जाच्या कृषी पद्धतींचा अवलंब केल्यामुळे भारताची केळी निर्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर जागतिक क्रमवारीतही केळी उत्पादनाच्या बाबतीत भारत अग्रेसर आहे.

भारताच्या केळी निर्यातीवर जर आपण नजर टाकली तर २०१८-१९ मधील ४१३ कोटी रुपये मूल्य असलेल्या १,३४ लाख मेट्रिक टन वरून वाढून २०१९-२० मध्ये ६६० कोटी रुपये मूल्य आणि 1.95 लाख मेट्रिक टन पर्यंत वाढली आहे. २०२०-२०२१ (एप्रिल-फेब्रुवारी) दरम्यान भारताने १.९१ लाख टन केळी निर्यात केली असून त्याचे मूल्य ६१९ कोटी रुपये आहे.

 

Exit mobile version