गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानातील काही भागात दहशतवाद्यांना गोळ्या घालून मारण्यात आले. त्यानंतर काही दिवसांपूर्वी पाकिस्तानात मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहीम ठार झाल्याची बातमी समोर आली होती. मोस्ट वॉण्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्यावर कराचीमध्ये विषप्रयोग करण्यात आल्याचा दावा केला जात होता. पुढे या अफवा असल्याच्याही बातम्या समोर आल्या. त्यानंतर आता भारतीय संसद हल्ल्यातील आरोपी मसूद अझहर ठार झाल्याच्या बातम्या काही वृत्तस्थळांवरून देण्यात येत आहेत. मात्र, अद्याप त्याच्या ठार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही.
जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आणि भारतीय संसदेवर हल्ला रचण्याच्या कटातील आरोपी मसूद हा सोमवार, १ जानेवारी रोजी सकाळी ५ वाजता मारला गेला. पाकिस्तानमधील बहावलपूर येथे एका बॉम्बस्फोटात तो मारला गेल्याच्या बातम्या उघड होत आहेत.
जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा नेता मसूद अझहरचा अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या बॉम्बस्फोटात मृत्यू झाला आहे. पाकिस्तानमधील सोशल मीडियातील वृत्तानुसार, मोस्ट वाँटेड दहशतवादी, कंदहार विमानचा अपहरणकर्ता, जैश-ए-मोहम्मद संघटनेचा नेता आणि संसद हल्ल्यातील आरोपी मसूद अझहर हा बहावलपूर मशिदीतून परतत होता. त्यावेळी अज्ञात लोकांनी सकाळी ५ वाजता केलेल्या बॉम्बस्फोटात तो ठार झाला आहे.
हे ही वाचा:
मोदीच येणार! द गार्डीयनचाही दावा
इस्रोकडून भारतीयांना नव्या वर्षाची भेट; XPoSAT चे यशस्वी प्रक्षेपण!
आग्राची महिला प्रभू रामांच्या मूर्तीसाठी विणत आहे रेशीम वस्त्रे!
मशिदीत ११ वेळा ‘श्री राम जय राम, जय जय राम’ जप करा!
मसूद अझहर कोण आहे?
अझहर याचा जन्म १९६८ मध्ये पाकिस्तानात झाला. तो पाकिस्तानातील पंजाबमधील बहावलपूर येथील रहिवाशी आहे. अतिरेक्यांनी कंदहार विमानाचे अपहरण करुन मसूद अझहरसह काही दहशतवाद्यांची सुटका केली होती. त्याने १३ डिसेंबर २००१ रोजी भारतीय संसदेवर दहशतवादी हल्ला करण्याचा कटही रचला होता. संसद हल्लाप्रमाणे २००५ मधील अयोध्या रामजन्मभूमी हल्ला आणि फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील कटात तो सहभागी होता. याशिवाय भारताविरोधातील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये तो सामील होता. २०१६ मध्ये झालेल्या पठाणकोट हल्ल्याचा तो मास्टरमाइंड आहे. तो अल-कायदा चीफ ओसामा बिन लादेन आणि तालिबान फाउंडर मुल्लाह उमर याचा खास होता.