बसेसना अँटीमायक्रोबियल केमिकल कोटिंग करण्यासाठी दोन कंत्राटदारांना काम देण्यात आले आहे. त्यापैकी स्टार इंटरप्राइजेस कंपनीने चक्क एसटी महामंडळाच्या अधिकृत लोगो सोबत छेडछाड केली.
मुख्य म्हणजे जय महाराष्ट्र हे बोधवाक्यचे यातून काढण्यात आलेले आहे. त्यामुळेच हे लेबल लावले गेले कसे असा प्रश्न आता सर्वांनाच पडलेला आहे. त्यामुळेच आता महामंडळ झोपेतून जागे झाले आहे, घडलेल्या प्रकारावर आता कारवाई करण्याचे एसटी महामंडळ प्रशासनाने सांगितले आहे. अधिकृत लोगोवर ‘जय महाराष्ट्र’ या वाक्याचा उल्लेख असतांना, स्टिकरवरील लोगोमधून जय महाराष्ट्र हे वाक्यच वगळण्यात आले आहे. या झालेल्या गोष्टीची चर्चा आता सर्वठिकाणी होऊ लागलेली आहे.
मुख्य बाब म्हणजे कंपनीला लोगो वापरण्याची परवानगी दिली कुणी यावर आता चर्विताचर्वण होऊ लागलेले आहे. शिवाय जय महाराष्ट्र हे वाक्य वगळण्यात आल्यामुळे आता कर्मचारी वर्गामध्येही हे लेबल चर्चेचा विषय बनले आहेत. एसटी महामंडळाकडून स्टार इंटरप्राइजेस, जे बी कन्स्ट्रेशन या दोन कंपन्यांकडून राज्यातील बसेस अँटीमायक्रोबियल कोटिंग करण्यात येत आहे. नुकतीच यासंदर्भातील निविदा प्रक्रिया पार पडली आहे. शिवाय आता स्टार इंटरप्राइजेस कंपनीने आपले स्टिकर बसेसच्या आतमध्ये लावले सुद्धा आहे.
हे ही वाचा:
यंदा गणेशोत्सव मंडळांचा उत्साह फिका
त्या मुलीने अचूक ओळखले ‘छोटे सर’ला आणि पाठवले तुरुंगात
कल्याण स्थानकात गर्दुल्यांची गर्दी
जुन्याच कंत्राटदाराकडून काम केल्यामुळे नवी ‘डोकेदुखी’
कंपनीला लोगो वापरण्याचे अधिकार नाही. तशी परवानगीही कंपनीने घेतली नाही. त्यामुळे या घटनेनंतर त्वरित असे स्टिकर हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे. तसेच महामंडळाची प्रतिमा जनमानसात मलिन करून महामंडळाला हानी पोहचवल्याने कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता वर्कर्स असोसिएशनकडून करण्यात येत आहे.