पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातल्या मानशेरा जिल्ह्यतल्या बालाकोट हे एक ठिकाण आहे. भारत देशाच्या नियंत्रण रेषेपासून अर्थात एलओसी पासून सुमारे २३१ किलोमीटरच्या अंतरावर आहे. चार वर्षांपूर्वी २६ फेब्रुवारी २०१९ साली अचानक बालाकोट पुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले. भारतीय वायुसेनेने भल्या पहाटेच हवाई हल्ल्याने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा तळ उध्वस्त केला होता. या हल्ल्यामध्ये सुमारे ३०० दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त आहे.
१४ फेब्रुवारी २०१९ रोजी सीआरपीएफच्या भारतीय जवानांवर केलेल्या आत्मघाती हल्ल्यामुळे त्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी हा हवाई हल्ला करण्यात आला होता. या हवाई हल्ल्याच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त पाकिस्तान सध्या नियंत्रण रेषेवर शांत असताना भारत आता अधिक शक्तिशाली झाला आहे. निवृत्त एअर मार्शल अनिल चोप्रा यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले कि, २०१९ मध्ये भारतीय हवाई दलाने एक मोठे उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे.
हे ही वाचा:
मुश्रिफांवर अखेर कोल्हापुरात गुन्हा दाखल
आझाद यांना ‘गुलाम’ म्हणणाऱ्या जयराम रमेश यांच्यावर २ कोटींचा दावा
‘जमाई’ करायला गेला कमाई आणि आला पोलिसांच्या जाळ्यात
कोविडनंतर बेरोजगारीचे प्रमाण घसरणीला.. आले इतक्या टक्क्यांवर
शांततेच्या काळांत आपल्या हवाई दलाने पाकिस्तानात त्याच्या घरात घुसून हल्ला करण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असेल. आता आपल्याकडे राफेल जेट विमाने असल्यामुळे ती विमाने गेम चेंजर असल्यामुळे अतिशय सक्षम आणि लांब पल्ल्यांच्या शस्त्रांनी आता आपण सुसज्ज आहोत. अशा स्थितीत जर का आणखी हवाई हल्ला झाला तर अशीच कारवाई करण्यात येईल. राफेल जेट क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहेत. जी लांबचा प्रवास करू शकतात. जेव्हा बालाकोट हल्ला झाला त्यावेळेस अशी कोणतीही शस्त्रे आपल्याकडे उपलब्ध नव्हती.
मागील वर्षी फेब्रुवारी २०२१ मध्ये भारत आणि पाकिस्तान नियंत्रण रेषेवर युद्धविराम झाला आहे. पाकिस्तान युद्धबंदीचे काटेकोर पालन करत आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की चार वर्षांपूर्वी उद्ध्वस्त झालेल्या छावण्या आता तिथे नाहीत. अजूनही नियंत्रण रेषेच्या पलीकडे दहशतवाद्यांचे दहा ते बारा तळ परत उभे राहिले आहेत. सूत्रांच्या माहिती नुसार हे सर्व तळ जैश-ए-मोहम्मदाचे असल्याची माहिती आहे. पण पाकिस्तानने लक्षात ठेवावे कि खेळ आता पूर्ण बदलला आहे.