इटलीलाही वाटते, रशिया-युक्रेन युद्धसमाप्तीत नरेंद्र मोदी महत्त्वाची भूमिका बजावतील!

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी भारत भेटीत व्यक्त केला विश्वास

इटलीलाही वाटते, रशिया-युक्रेन युद्धसमाप्तीत नरेंद्र मोदी महत्त्वाची भूमिका बजावतील!

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर नवी दिल्लीत दाखल झाल्या आहेत. गेल्या पाच वर्षांत इटलीच्या सर्वोच्च नेत्याची अशा प्रकारची ही पहिलीच भारत भेट आहे.

जी – २० बैठकीचा एक भाग म्हणून इटलीच्याच पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी नवी दिल्ली येथे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर दाखल आहेत आठव्या रायसीना चर्चेच्या प्रमुख अतिथी म्हणून बोलताना जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे ‘पंतप्रधान मोदी हे जगभरातील सर्व नेत्यांमध्ये सर्वात प्रिय आहेत. ते एक प्रमुख नेते आहेत हे खरेच सिद्ध झाले आहे आणि त्याबद्दल त्यांचे अभिनंदन असे मेलोनी यावेळी म्हणाल्या.

संयुक्त पत्रकार परिषद बोलतांना पंतप्रधान मेलोनी म्हणाल्या की, पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वात आवडते नेते आहेत. ते किती मोठे नेते आहेत हे सिद्ध झाले आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. यावेळी हे ऐकताना पंतप्रधान मोदी यांना हसू आवरले नाही यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भारत आणि इटली यांच्यातील स्टार्ट- अप दुव्याची घोषणा केली.

हे ही वाचा:

आठवलेंच्या ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ पक्षाने काय केले, नागालँडमध्ये…

‘क्वालिटी सिटी उपक्रमांत’ देशात मिळाला नाशिकला पहिला मान

६० वर्षानंतर प्रथमच एका महिलेला आमदारकीचा मान

आता पंतप्रधान, मुख्य न्यायाधीश, विरोधी पक्षनेता करणार निवडणूक आयुक्ताची निवड

भारतासोबत आमचे संबंध खूप मजबूत आहेत. धोरणात्मक भागीदारी कायम ठेवण्यासाठी आम्ही काम करत राहू. रशिया- युक्रेन युद्ध संपवण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकेल, अशी आम्हाला आशा आहे असे मेलोनी म्हणाल्या.मेलोनी पुढे म्हणाल्या, आमच्या भव्य स्वागतासाठी मी पंतप्रधान मोदी आणि भारताचे आभार मानते. आमचे नाते आणखी पुढे नेण्यासाठी आम्ही आमची भागीदारी धोरणात्मक भागीदारीत बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

यावर भाष्य करतांना पंतप्रधान म्हणाले, युक्रेन युद्धाच्या सुरुवातीपासूनच भारताने हा वाद संवाद आणि मुत्सद्देगिरीनेच सोडवला जाऊ शकतो हे स्पष्ट केलं आहे. भारत कोणत्याही शांतता प्रक्रियेत योगदान देण्यास तयार आहे. इंडो- पॅसिफिकमध्ये इटलीच्या सक्रिय सहभागाचेही आम्ही स्वागत करतो. इटलीने इंडो- पॅसिफिक महासागर उपक्रमात सामील होण्याचा निर्णय घेतला ही अतिशय आनंदाची बाब आहे.

आमच्यात ७५ वर्षांपासून राजनैतिक संबंध आहेत, पण आजपर्यंत संरक्षण संबंध नव्हते. आज आपण याचीही सुरुवात करत आहोत. याशिवाय नवीकरणीय ऊर्जा, हायड्रोजन, आयटी, दूरसंचार, सेमीकंडक्टर आणि अंतराळ या विषयांवर दोन्ही देश एकत्र काम करतील अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिली.

Exit mobile version