पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुबई दौऱ्यादरम्यान विविध देशांच्या अध्यक्षांची भेट घेतली. या दरम्यान त्यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचीही भेट घेतली. मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींसोबत सेल्फीही घेतला आणि सोशल मीडियावर पोस्ट करून ‘आम्ही चांगले मित्र आहोत,’ असे लिहिले. त्यांनी फोटो पोस्ट करून #मेलोदी म्हणजे मेलोनी आणि मोदी असे लिहिले आहे.
पंतप्रधान मोदी हे हवामान बदलासंदर्भातील परिषदेसाठी एक दिवसीय दौऱ्यासाठी दुबईत गेले होते. त्या वेळी त्यांनी विविध राष्ट्रप्रमुखांच्या गाठीभेटी घेतल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेलोनी यांच्यासह ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, ब्राझीलचे पंतप्रधान लुइज इनासियो लुला दा सिल्वा, ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्री डेव्हिड कॅमरून, ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचीही भेट घेतली. परिषदेत मोदी यांनी अन्य नेत्यांसोबत सामूहिक छायाचित्रही घेतले.
हे ही वाचा:
युपीआयचा नवा रेकॉर्ड; नोव्हेंबर महिन्यात १७.४० लाख कोटींचे व्यवहार
गांगुली म्हणतात, “कर्णधार म्हणून रोहितच बेस्ट!”
महुआंच्या चौकशीचा अहवाल ४ डिसेंबरला लोकसभेत सादर होणार
२०२८मधील सीओपी यजमानपदासाठी भारत उत्सुक
संयुक्त राष्ट्राकडून कौतुक
संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनिया गुटेरेस यांनीही मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी यांनी हवामान बदलाचे लक्ष्य गाठण्यासाठी भारताकडून सुरू असलेल्या प्रयत्नांकडे लक्ष वेधले. गुटेरेस यांनी भारताच्या या प्रयत्नांचे कौतुक केले. गुटेरेस यांनी पंतप्रधान मोदी यांच्या ग्रीन क्रेडिट उपक्रमांचेही कौतुक केले.
ग्रीन क्रेडिट्स उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन
आपल्या भविष्यातील पिढीचे भविष्य सुरक्षित बनवण्यासाठी मोदी यांनी ग्रीन क्रेडिट्स उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जागतिक नेत्यांना केले. तसेच, परिषदेचे उत्तम नियोजन केल्याबद्दल त्यांनी यूएईचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झाएद अल नाहयान यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.