पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जी-७ परिषदेसाठी इटलीमध्ये दाखल झाले होते. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाचं नरेंद्र मोदी विदेश दौऱ्यावर आले होते. इटलीमंध्ये नरेंद्र मोदींचे मोठ्या उत्साहात स्वागत झालं. यावेळी नरेंद्र मोदींनी जगभातल्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली तर, काही देशांच्या नेत्यांशी त्यांनी द्विपक्षीय चर्चा देखील केली. पंतप्रधानांनी इटलीमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन, ब्रिटनचं पंतप्रधान ऋषी सुनक आणि फ्रान्सचे राष्ट्रपती इमैनुएल मॅक्रो यांच्यासह जगभरातल्या अनेक नेत्यांसोबत चर्चा केली. यावेळी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना नरेंद्र मोदींसोबत फोटो घेण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी लगेचच त्यांच्या फोनमध्ये नरेंद्र मोदींसोबत एक सेल्फी घेतला. याशिवाय ग्रुप फोटोमध्येही नरेंद्र मोदींना मंचावर विशेष स्थान दिलं गेलं होतं.
PM Narendra Modi and Italy's PM Giorgia Meloni's selfie on the sidelines of the G7 summit, in Italy. pic.twitter.com/wE1ihPHzeq
— ANI (@ANI) June 15, 2024
जी-२० परिषदेनिमित्त इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या भारतात आल्या होत्या. तेव्हापासून त्यांची भारतातील लोकप्रियता कमालीची वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी हे दोघेही आपआपल्या देशात प्रचंड लोकप्रिय आहेत. अशातच आता या स्लेगीने पुन्हा एकदा साऱ्यांचे लक्ष वेधले आहे. जी-७ परिषदेच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत एक सेल्फी काढला. नरेंद्र मोदी हे जी-७ परिषदेसाठी पोहोचले, तेव्हा जॉर्जिया मेलोनी यांनी भारतीय परंपरेनुसार ‘नमस्ते’ करुन त्यांचं स्वागत केलं. यावेळी नरेंद्र मोदी रा-७ मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि टेक्नोलॉजीची एकाधिकारशाही संपवण्यावर बोलले. तंत्रज्ञानाचा फायदा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे. ही फक्त आपली इच्छा नाही, जबाबदारी असली पाहिजे असं त्यांनी सांगितलं.
हे ही वाचा..
विवान कारुळकरच्या पुस्तकाची ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने घेतली दखल
‘तंत्रज्ञानातील मक्तेदारी संपवा’
प. बंगालमधील निवडणुकीनंतरचा हिंसाचार म्हणजे मृत्यूचे तांडव!
सुरत महानगरपालिकेच्या १३ मंदिरांना पाडण्याच्या नोटीसनंतर विहिंपकडून निदर्शनांचा इशारा!
पंतप्रधानांनी शनिवारी आपल्या ‘एक्स’ अकाऊंटवर लिहिलं की, जी-७ परिषद अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. जगभरातल्या नेत्यांसोबत संवाद साधता आला. सर्वांनी सोबत मिळून काम केल्यास वेगवेगळ्या विषयांवर तोडगा निघणार आहे. यातून भावी पिढ्यांसाठी एक सुंदर जग निर्माण करता येणार आहे. मी इटली सरकार आणि त्यांच्या लोकांचे आभार मानतो.