पंतप्रधानांची खिल्ली उडवल्याबद्दल इटालियन पत्रकाराला ४.५ लाखांचा दंड

पंतप्रधान मेलोनी यांची खिल्ली उडवल्याबद्दल कारवाई

पंतप्रधानांची खिल्ली उडवल्याबद्दल इटालियन पत्रकाराला ४.५ लाखांचा दंड

इटलीच्या पंतप्रधानांची खिल्ली उडवणे एका पत्रकाराला चांगलेच महागात पडले आहे. न्यायालयाने या पत्रकाराला मोठा दंड ठोठावला आहे. हे प्रकरण इटलीचे असून जिथे तिथल्या न्यायालयाने पंतप्रधान मेलोनी यांची खिल्ली उडवल्याबद्दल पाच हजार युरो म्हणजेच ४.५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. पत्रकाराने पंतप्रधान मेलोनी यांना ही रक्कम द्यावी, कारण त्यांची प्रतिमा खराब झाली आहे, असे मिलान न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.

स्थानिक मीडियानुसार, पत्रकार जिउलिया कोर्टेसी यांनी जॉर्जिया मेलोनी यांच्या उंचीबद्दल एक मजेदार पोस्ट केली होती. पंतप्रधान यांच्याबद्दल ‘बॉडी शेमिंग’ संदर्भात चेष्टा केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय ऑक्टोबर २०२१ मध्ये एक्सवर लिहिलेल्या पोस्टसाठी १२०० युरोचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

मात्र, न्यायालयाच्या या निर्णयावर पत्रकाराने नाराजी व्यक्त केली आहे. कोर्टाच्या निर्णयासंदर्भात रॉयटर्सच्या बातम्यांना प्रतिसाद देताना, कोर्टेसी यांनी एक्सवर लिहिले की, इटालियन सरकारला भाषण स्वातंत्र्य आणि पत्रकारांमधील मतभिन्नतेच्या अनेक समस्या आहेत. तीन वर्षांपूर्वी इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि पत्रकार कोर्टेसी यांच्यात सोशल मीडियावर भांडण झाले होते. त्यानंतर पीएम मेलोनी यांनी पत्रकाराविरोधात कायदेशीर भूमिका घेतली होती.

महिला पत्रकाराने तिच्या ट्वि

हे ही वाचा:

सूर्यकुमार टी-२०चा कर्णधार, शुभमनकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी

यूपीएससी नापास, तरीही परराष्ट्र सेवेत असल्याचा बनाव… ज्योती मिश्राची चक्रावून टाकणारी कहाणी

जगातील लोकसंख्येला मुस्लिम जबाबदार, भारतातही तीच परिस्थिती !

उत्तर प्रदेशात मोठा रेल्वे अपघात; दिब्रूगड एक्स्प्रेसचे १० डबे घसरले

टमध्ये लिहिले होते की, जॉर्जिया मेलोनी, तू मला घाबरवू शकत नाहीस. शेवटी, तू फक्त चार फूट उंच आहेस. मी तुला पाहूही शकत नाही. यानंतर कोर्टेसी या शिक्षेविरुद्ध अपीलही करू शकतात. दरम्यान, मेलोनी यांच्या वकिलाने सांगितले की, जर पंतप्रधानांना पत्रकाराकडून रक्कम मिळाली तर ती ते चॅरिटीला देतील.

कोर्टेसी यांनी गुरुवारी ट्विटरवर पोस्ट केले की इटलीमधील स्वतंत्र पत्रकारांसाठी ही कठीण वेळ आहे. येणाऱ्या काळात आणखी चांगल्या दिवसांची आशा ठेवायला हवी. आम्ही अजिबात मागे हटणार नाही. तुम्हाला सांगतो की, मेलोनी यांची पत्रकाराशी भांडण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी, रॉबर्टो सॅव्हियानो यांना एक हजार युरो आणि कायदेशीर खर्चाचा दंड ठोठावला होता. रॉबर्टो यांनी २०२१ मध्ये टीव्हीवर मेलोनी यांचा अपमान केल्याचे हे प्रकरण होते.

Exit mobile version