24 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरदेश दुनियाभोपळा झाला सर्वाधिक मार्कांनी ‘पास’

भोपळा झाला सर्वाधिक मार्कांनी ‘पास’

Google News Follow

Related

एरवी परीक्षा आणि भोपळा यांचे एकमेकांशी जुळत नाही पण हाच भोपळा ‘परीक्षेत’ उत्तीर्ण झाला तर… इटलीत अशाच एका भोपळ्याने अव्वल क्रमांक मिळवला

एका इटालियन शेतकऱ्याने आतापर्यंतचा सर्वात वजनदार भोपळा पिकवला आहे. या भोपळ्याचे वजन तब्बल १२२६ किलो इतके आहे. इटलीतील स्टेफानो कत्रूपी हे २००८ पासून असे महाकाय भोपळे पिकवत आहेत. यापूर्वीही ऑक्टोबर २०१६ मध्ये बेल्जियममधील मॅथियास विलेमिजेन्स नावाच्या व्यक्तीने जगातील सर्वात मोठा भोपळा पिकवून गिनीज बुकमध्ये आपले नाव नोंदवले होते.

हा भोपळा निस्सान मायक्रा या कारपेक्षा जड आहे. २६ सप्टेंबर रोजी पिसाजवळील पेसिओली येथे कॅम्पियोनाटो डेला झुकोन भोपळा महोत्सवाच्या १० व्या आवृत्तीत हा भोपळा समोर आणला होता.

हे ही वाचा:

दिवाळीसाठी रोषणाई करताना कुटुंबाला लागला विजेचा धक्का; एकाचा मृत्यू   

गाणी वाजवणाऱ्यांना तालिबानींनी घातल्या गोळ्या; १३ ठार

गांजा फुकून आरोप करताना थोडा अभ्यास करा

१० दिवसांत महाराष्ट्रात ४ बँका केल्या साफ!

हा भोपळा मार्चमधल्या बियापासून उगवला होता. कत्रूपी असे वाटले होते की, जुलैच्या अखेरीस त्याच्या हातात विश्वविक्रम करणारा भोपळा असेल, परंतु जगात मोठी फळे आणि भाजीपाला पिकवण्याची कोणतीही विशेष स्पर्धा नाही. यामध्ये कधीही काहीही होऊ शकते. कत्रूपी म्हणाले की, जेव्हा माझ्या मित्रांनी आणि लोकांनी वजन पाहिले तेव्हा त्यांनीही त्याबद्दल जबरदस्त प्रतिक्रिया दिल्या. अनुक्रमे ९७८.९९ किलो (२,१५८ पाउंड ४.८ औंस) आणि ७९४.५१ किलो (१,७५१ पौंड ९.५ औंस) वजनाच्या दोन इतर प्रवेशांसह त्यांनी लो झुकॉन स्पर्धेत दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले,

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा