अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या नेतृत्वात अमेरिकेने अफगाणिस्तानमधून काढता पाय घेतला आहे. माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडन सरकारवर हल्लाबोल करत त्यांच्या अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी घेण्याच्या धोरणावर कडाडून टीका केली आहे.
“सगळ्यात आधी अमेरिकन नागरिकांना अफगाणिस्तानमधून परत आणायला हवं होतं, त्यानंतर सगळी शस्त्रास्त्र परत आणायला हवी होती. त्यानंतर उर्वरित सैन्य तळांवर मोठ्या प्रमाणात बॉम्ब टाकून ते नेस्तनाबूत करायला मग अमेरिकन सैनिकांना परत आणायला हवं होतं. परंतु बायडन सरकारने हे सर्व उलट्या क्रमाने केल्यामुळे मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि अनागोंदी माजली आहे. जर योग्य क्रमवारीत घटनाक्रम झाला असता तर तालिबानला कळलंही नसतं आपण केंव्हा निघून गेलो.” असं विधान ट्रम्प यांनी केलं आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर आपली भूमिका स्पष्ट करताना तालिबानकडून अमेरिकेच्या सैन्यावर होणारा हल्ला सहन करणार नसल्याचं सांगत तालिबानला सज्जड दम भरलाय. याशिवाय अफगाणिस्तानमधील महिला आणि मुलांवरील हल्ले देखील सहन करणार नाही, असंही त्यांनी नमूद केलं. विशेष म्हणजे आतापर्यंत १८,००० लोकांना सुखरुप बाहेर काढल्याचं सांगताना बायडन यांनी रेस्कू ऑपरेशननंतर संपूर्ण सैन्य अफगाणमधून बाहेर काढू, असंही सांगितलं.
हे ही वाचा:
पुलवामामध्ये ३ अतिरेक्यांना कंठस्नान
दीडदमडीच्या लोकांनी राज ठाकरेंविषयी बोलू नये
जो बायडन म्हणाले, “पुढील आठवड्यात जी ७ बैठकीत अफगाणिस्तान मुद्यावर चर्चा करणार आहे. अमेरिकेच्या सैन्यावर केलेला हल्ला सहन केला जाणार नाही. तालिबानने अमेरिकेवर हल्ला केला तर त्याला उत्तर देऊ. नाटो देश अमेरिकेबरोबर उभे आहेत. आतापर्यंत १८,००० लोकांना सुखरूप बाहेर काढले आहे. जेलमधून निघालेले इस्लामिक स्टेटचे दहशतवादी हल्ला करू शकतात. अफगाणिस्तानमध्ये संकट मोठं आहे.”