शुक्र ग्रह सर्वात उष्ण ग्रह मानला जातो. शुक्र ग्रहावर जगात अभ्यास केला जात आहे. मात्र आता चंद्र आणि मंगळ मोहिमेनंतर इस्रो आता भारत, अमेरिका आणि इतर देशांसह शुक्रावर मोहीम करणार आहे. शुक्र ग्रहावर इस्रो आता अंतराळयान पाठवणार आहे. शुक्राच्या वातावरणाची माहिती गोळा करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.
इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ म्हणाले की, या मोहिमेवर अनेक वर्षांपासून काम सुरू आहे. अंतराळ संस्था आता शुक्र ग्रहावर आपले यान पाठवण्यास तयार आहे. प्रकल्प अहवाल तयार असून पूर्ण आराखडा तयार करण्यात आला आहे. खर्चाचा अंदाज आला आहे, सर्व कामे पूर्ण झाली आहेत. फार कमी वेळात भारत मिशन व्हीनससाठी सज्ज होणार असल्याचे सोमनाथ म्हणाले.
इस्रो २०२४ मध्ये या मोहिमेची योजना आखात आहेत. डिसेंबर २०२४ मध्ये जेव्हा पृथ्वी आणि शुक्र जवळ येतील तेव्हा शुक्रावर यान सोडण्यात येणार आहे. शुक्र पृथ्वीपासून सरासरी ४१० दशलक्ष किमी दूर आहे. सूर्याभोवती फिरत असताना ह्या अंतरात वाढ कमी जास्त होत राहते. डिसेंबर २०२४ मध्ये शुक्र पृथ्वीच्या अगदी जवळ येणार असून, यामुळे अंतराळयानाला सर्वात लहान कक्षीय मार्ग निश्चित करणे शक्य होणार आहे. पुढील वेळी अशी संधी २०३१ साली येणार आहे.
हे ही वाचा:
भीमा कोरेगाव प्रकरणात संभाजी भिडेंविरोधात पुरावे नाहीत
बँडस्टँड येथील मोक्याचा शासकीय भूखंड कवडीमोल किंमतीने बिल्डरच्या घशात
साईंची आरती भोंग्यावर होऊ दे, मुस्लिम समाजाची प्रशासनाला विनंती
या विषयांवर पंतप्रधान मोदींनी नॉर्डिक देशांशी केली चर्चा
दरम्यान, शुक्र हा सूर्यमालेतील सर्वात रहस्यमय ग्रह आहे. तो सल्फरच्या ढगांनी झाकलेले आहे, म्हणून पृष्ठभागावर ज्वालामुखी आणि लावा आहे. सप्टेंबर २०२० मध्ये शास्त्रज्ञांनी फॉस्फिन वायू सापडल्याचा दावा केला होता, हा वायू सूक्ष्म जीव देखील बनवतो. भारतीय मिशन पृथ्वीबाहेरील जीवनाची पुष्टी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.