चांद्रयान ३ शुक्रवारी अवकाशात झेपावणार आहे. या उपक्रमाला यश मिळावे यासाठी इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ हे तिरुपती देवस्थानला गेले. तिथे त्यांनी चांद्रयान ३ ची प्रतिकृतीही सोबत नेली होती.
पत्रकारांशी बोलताना सोमनाथ म्हणाले की, भारत आपल्या तिसऱ्या चांद्र मोहिमेच्या अनुषंगाने चांद्रयान ३ शुक्रवारी पाठवणार आहे. मी प्रार्थना करतो की, सगळे काही व्यवस्थित व्हावे. त्यानंतर २३ ऑगस्टला हे चांद्रयान चंद्रावर उतरेल. चांद्रयान ३च्या या उपक्रमावर काम करणाऱ्या सर्व शास्त्रज्ञांनी तिरुपती मंदिराला भेट दिली.
चांद्रयान २च्या प्रयत्नात भारताला थोडक्यात अपयशाचा सामना करावा लागला होता. आता हे चांद्रयान चंद्रावर उतरल्यानंतर एक ल्युनार दिवस काम करणार आहे म्हणजे पृथ्वीचे १४ दिवस. चंद्रावरील एक दिवस म्हणजे पृथ्वीवरील १४ दिवस. इस्रोचे माजी संचालक के. सिवन म्हणाले की,चांद्रयान ३ ला यश मिळाले की, त्यातून गगनयान उपक्रमाला मोठे पाठबळ लाभणार आहे.
हे ही वाचा:
बच्चू कडू मंत्रिपदाचा दावा सोडणार होते, पण मुख्यमंत्र्यांच्या फोनमुळे थांबले
आंध्र प्रदेशातून चंद्र प्रदेशात; आज चांद्रयान ३ घेणार झेप
राज्यातील प्रत्येक बालकांचा सर्वांगीण विकास करण्यावर भर : महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा
रोहित शर्मा, यशस्वीमुळे भारताची सामन्यावर पकड
सिवन म्हणाले की, चांद्रयान २च्या वेळेला कोणत्या त्रुटी होत्या त्या आम्हाला कळल्या आहेत. त्यामुळे यावेळी त्या चुका टाळण्याचा आमचा प्रयत्न असेल. यावेळी मात्र भारताला यश नक्कीच मिळेल. भारतीय शास्त्रज्ञाना प्रचंड आत्मविश्वास आहे. आता सगळ्या समस्या दूर झाल्या आहेत.