32 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरदेश दुनियाइस्रोने रचला इतिहास, एकाचवेळी ३६ उपग्रह आभाळात झेपावले

इस्रोने रचला इतिहास, एकाचवेळी ३६ उपग्रह आभाळात झेपावले

एलव्हीएम-3 रॉकेटचे यशस्वी उड्डान

Google News Follow

Related

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आज, रविवारी एकाचवेळी ३६ उपग्रह लाँच केले. ब्रिटिश कंपनीच्या उपग्रहांना घेऊन एलव्हीएम-3 रॉकेटने सकाळी ९ वाजता श्रीहरिकोटा येथून अवकाशात आकाशात उड्डाण घेतले. विशेष म्हणजे हे रॉकेट आपल्यासोबत अंतराळात ३६ सॅटेलाइट एकत्र घेऊन गेल्याने एक वेगळा इतिहास रचला गेला.

इस्रोच्या साडे ४३ मीटर लांबीच्या या रॉकेटनी ब्रिटेनच्या एका कंपनीचे ३६ उपग्रह आपल्यासोबत घेऊन अवकाशात झेप घेतली. उपग्रहांना घेऊन एलव्हीएम-3 ने झेप घेतल्यानंतर त्याचं एकूण वजन ५ हजार ८०५ टन आहे. या मिशनला एलव्हीएम-3 /वनवेब इंडिया-2 असं नाव देण्यात आलं. इस्रोने ट्वीट करुन या मिशनच्या लाँचिगची माहिती दिली होती. एलव्हीएम-3 इस्रोचा सर्वात मोठा रॉकेट आहे ज्याने आता पर्यंत पाच वेळा यशस्वी उड्डाण केले आहे. ज्यामध्ये चंद्रयान-2 मिशनसुद्धा सहभागी आहे.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरे हे खरे दरोडेखोर!

प्रियांका गांधींनी केले परिवारवादाचे समर्थन; म्हणाल्या, श्रीराम, पांडवही परिवारासाठीच लढत होते!

वैभव मांगले म्हणतोय ‘भय इथले संपत नाही!’

कॅगचा अहवाल आला; महापालिकेवर दरोडा टाकणाऱ्यांचा बुरखा फाटणार

मुळात ब्रिटेनची वनवेब ग्रुप कंपनीने इस्रोच्या वाणिज्यिक शाखा न्यूस्पेस इंडिया लिमिटेडपासून ७२ उपग्रह लाँच करण्याचा करार केला आहे. यामध्ये २३ ऑक्टोबर २०२२२ रोजी २३ उपग्रह इस्रोने यापूर्वीच लाँच केले होते. आज बाकी असलेले 23 उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत जाणार आहेत. इस्रोच्या या लाँचिगमुळे पृथ्वीच्या कक्षेत वेब वन कंपनीचे उपग्रहांची एकूण संख्या ६१६ होणार.

इस्रोचा या वर्षीचा हा दुसरा लाँच आहे. ही लाँचिग यशस्वी झाल्यास वनवेब इंडिया-2 स्पेस मध्ये ६०० पेक्षा जास्त लोअर अर्थ ऑर्बिट सेटेलाइट्सच्या कान्स्टलेशन पूर्ण करणार. सोबतच यामुळे जगातील प्रत्येक स्पेस आधारीत ब्रॉडबँड इंटरनेट योजनामध्ये मदत मिळणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा