28 C
Mumbai
Friday, November 1, 2024
घरदेश दुनियाइस्रायलचे ‘स्पाईक’ वाढवणार भारतीय वायूदलाची ताकद!

इस्रायलचे ‘स्पाईक’ वाढवणार भारतीय वायूदलाची ताकद!

उंचावर असणारे शत्रूचे टँक आणि इतर वाहनांना लक्ष्य करण्यासाठी होणार उपयोग

Google News Follow

Related

भारतीय सेनेची ताकद आता वाढणार असून इस्रायलकडून भारताला स्पाईक मिसाईल मिळणार आहे. इस्रायलने तयार केलेली ‘स्पाईक-NLOS’ मिसाईल आता भारतीय लष्काराच्या ताफ्यात येणार आहे. वायुसेनेच्या हेलिकॉप्टरमध्ये ही मिसाईल असणार आहे. उंचावर असणारे शत्रूचे टँक आणि इतर वाहनांना लक्ष्य करण्यासाठी या मिसाईलचा वापर होणार आहे. या क्षेपणास्त्राला चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर तैनात करण्यात येणार आहे.

भारतीय सैन्याकडे पूर्वीपासूनच एक स्पाईक मिसाईल आहे. मात्र, ही मिसाईल सैनिक आपल्या खांद्यावरुन लाँच करत होते. या मिसाईलचे एअर-फोर्स व्हर्जन भारताकडे आलं आहे. यामुळे आता हेलिकॉप्टरवरुन ही मिसाईल डागता येणार आहे. स्पाईक अँटी-टँक गाईडेड मिसाईल ही आकाराने लहान असते मात्र, याच्या मदतीने एक टँक उद्धवस्त केला जाऊ शकतो. ही मिसाईल खांद्यावर ठेऊन किंवा ट्रायपॉड-बायपॉड अशा स्टँडवर ठेऊनही डागली जाऊ शकते. हेलिकॉप्टर, टँक अशा वाहनांमध्येही ही मिसाईल घेऊन जाऊ शकतो.

हे ही वाचा:

जम्मू काश्मीरचा बेपत्ता जवान अखेर सापडला

लवासाचा सौदा हा दृश्यम् पार्ट थ्री??

कापसाच्या मुद्द्यावरून विधानपरिषदेत खडसे- महाजन यांच्यात जुंपली

गृहपाठ न केल्याने त्याने रचला स्वत:च्याच अपहरणाचा बनाव

स्पाईक ही एक गाईडेड मिसाईल आहे. एकदा लक्ष्य ठरलं की त्याने कितीही लपण्याचा प्रयत्न केला तरीही मिसाईल त्याचा वेध घेते. शत्रूच्या हेलिकॉप्टरचा वेध घेण्याची क्षमताही यामध्ये आहे. इस्राईलसोबतच जगातील ३५ देशांकडे ही मिसाईल आहे. या मिसाईलचे एकूण ९ व्हेरियंट आहेत. यानुसार त्यांच्या आकारात, लाँचिंग पद्धतीत आणि रेंजमध्ये बदल होतो. भारतीय सैन्याच्या हेलिकॉप्टरमध्ये ६०० ते २५ हजार मीटर रेंज असणारी स्पाईक मिसाईल बसवण्यात येणार आहे. या मिसाईलमध्ये इन्फ्रारेड सेन्सरही असतो. त्यामुळे अंधारातही शत्रूच्या वाहनांचा वेध घेण्याची क्षमता यात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
186,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा