उत्तर गाझाच्या सीमेवर इस्रायली रणगाडे

युद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता

उत्तर गाझाच्या सीमेवर इस्रायली रणगाडे

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असून दोन्ही बाजूने हल्ले सुरूच आहेत. दरम्यान, इस्रायईलचे रणगाडे आता प्रत्यक्ष उत्तर गाझाच्या सीमेवर येऊन पोहचल्याने हे युद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. इस्रायलने केलेल्या कारवाईत हमासचे शेकडो दहशतवादी ठार झाल्याचा दावा इस्रायली लष्कराकडून करण्यात आला आहे. गेल्या २४ तासांमध्ये ६०० पेक्षाही अधिक लक्ष्यांचा वेध घेतल्याचे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.

इस्राईलच्या लष्करी कारवाईमुळे या युद्धाची गंभीरता आणखी वाढणार असून त्यामुळे गाझातील नागरिकांना अधिक त्रास सहन करावा लागणार आहे. गाझा शहराच्या किनारी भागामध्ये असलेल्या झायतून जिल्ह्यात इस्राईलचे रणगाडे घुसल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे उत्तर आणि दक्षिण भागाला जोडणारे रस्ते पूर्णपणे उद्‍ध्वस्त झाले आहेत. दरम्यान, जीवितहानी टाळण्यासाठी गाझातील नागरिकांनी दक्षिणेच्या दिशेने स्थलांतर करावे, असा इशारा इस्रायलकडून याआधीच देण्यात आला होता.

इस्रायलला साथ देणाऱ्या अमेरिकेने या संघर्षात थेट स्वतःचे लष्कर उतरविण्यास सध्या तरी स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. या संघर्षामध्ये अमेरिकेने इस्राईलला पाठिंबा दिला असला तरीसुद्धा आम्ही तिथे लढण्यासाठी लष्कर पाठविणार नसल्याचे अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

मालमत्तेच नुकसान करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून अटक करण्याचे निर्देश

‘ट्रॅक्टर स्टंटबाजी’ करणाऱ्यांवर पंजाब सरकारने घातली बंदी!

ललित पाटीलवर ससून रुग्णालयाच्या डीनची कृपा; मुक्काम वाढविण्यासाठी पत्रव्यवहार

तेलंगणामध्ये प्रचारादरम्यान खासदारावर जीवघेणा हल्ला

इस्राईलच्या हल्ल्यामध्ये गाझातील आठ हजार नागरिक मरण पावले असून त्यात अनेक महिला आणि मुलांचा देखील समावेश असल्याचे स्थानिक यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे. तर, हमासने केलेल्या हल्ल्यात इस्रायलच्या बाजूनेही मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झालेली आहे.

Exit mobile version