पॅलस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर शनिवारी ५ हजारांहून अधिक रॅकेट्स डागून युद्धाला तोंड फोडलं. यानंतर इस्रायलकडून प्रत्युत्तराला सुरुवात झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या युद्धामुळे दोन्ही देशांमधील १ हजार ६०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेने एक महत्त्वाचं ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेकडून मुंबईत २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. “पाहिल्याशिवाय किंवा चौकशी केल्याशिवाय कोणत्याही दहशतवाद्याला समजून घेणं एखाद्या माणसासाठी कठीण आहे. मुंबई, इंडिया हॉटेल आणि चबड सेंटरवर झालेला दहशतवादी हल्ला आठवतो का? दहशतवादी हे रक्तपिपासू प्राणी असतात,” असं ट्वीटमध्ये मोसादने म्हटलं आहे.
It's hard for a human to understand a terrorist unless you see it for yourself or interrogate for hours and days.
Remember the terror attack in Mumbai, India hotel and Chabad center?
Terrorists are blood thirsty animals.
— ISRAEL MOSSAD (@MOSSADil) October 10, 2023
मोदास ही इस्रायलची गुप्तचर यंत्रणा आहे. इस्रायलमधील दहशतवादी कृत्ये आणि तिकडच्या संघटनांवर मोसादचे लक्ष असते. शिवाय अशा संघटनांवर मोसादकडून कारवाई केली जाते. हमासकडून होत असलेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड मोहम्मद दीफ असून हा मोहम्मद दीफ नवा ओसामा बिन लादेन असल्याचं इस्रायलचे म्हणणे आहे.
मोहम्मद दीफला पकडण्यासाठी मोसादकडून गेली कित्येक वर्षे प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे त्याला मारण्याकरिता मोसादने आतापर्यंत सातवेळा प्रयत्न केले आहेत. पण प्रत्येकवेळी मोसादला अपयश आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, दीफ अपंग आहे. स्वतःच्या पायावरही उभा राहू शकत नाही.
हे ही वाचा:
लेक लाडकी; महाराष्ट्रातल्या ‘नवदुर्गां’ना नवरात्रौत्सवाची भेट
मुंबईत मनसेचे टोलनाका आंदोलन पेटले; नवघर पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे
‘गडकरी’ सिनेमाचा जबरदस्त टिझर प्रदर्शित
भारतातील अमली पदार्थांच्या व्यापाराचे धागेदोरे पाकच्या ‘डी’ गँगपर्यंत
तर, मोठ्या प्रमाणात वित्तहानीही झाली आहे. रस्त्यांवर मृतदेहांचा खच पडला असून चहुबाजूंनी केवळ गोळीबाराचा आवाज येत असल्याचं तेथील नागरिक सांगत आहेत. या दरम्यान, इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेने एक महत्त्वाचं ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी मुंबईत २६/११ झालेल्या दहशतवादी हल्ल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.