इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान आता इस्रायलने लेबनॉनस्थित हिजबुल्ला या दहशतवादी गटाला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. हिजबुल्लाची सर्वच बाजूने कोंडी करण्यासाठी इस्रायलकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. हा संघर्ष दिवसेंदिवस वाढत असून हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरल्लाहला ठार केल्यानंतर इस्रायलने आता थेट लेबनॉनमध्ये प्रवेश करत युद्ध पुकारले आहे. इस्रायल डिफेंस फोर्सने दक्षिणी लेबनॉनच्या हिजबुल्लाच्या ठिकाणांवर ग्राऊंड ऑपरेशन सुरू केले आहे. इस्रायली सैन्याने अखेर दक्षिण लेबनॉनमध्ये प्रवेश केला असून हिजबुल्लाच्या ठिकाणांवर जमिनीवरून हल्ले करण्यास सुरुवात केली आहे.
इस्रायली सैन्याने म्हणजेच आयडीएफने पोस्ट केले आहे की, राजकीय नेतृत्त्वाच्या निर्णयानुसार काही तासांपूर्वी आयडीएफने दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्ला दहशतवादी आणि पायाभूत सुविधांच्या विरोधात मर्यादित आणि लक्ष्यित जमिनीवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. या हल्ल्यांमध्ये सीमेजवळील गावे लक्ष्य करण्यात आली आहेत. ही गावे उत्तर इस्रायलमधील इस्रायली समुदायांना त्वरित धोका निर्माण करतात.
आयडीएफ जनरल स्टाफ आणि नॉर्दर्न कमांडने ठरवलेल्या नियोजनबद्ध योजनेनुसार ही मोहीम राबवण्यात येत आहे. यासाठी सैनिकांनी अलीकडच्या काही महिन्यांत प्रशिक्षण घेऊन तयारी केली होती. इस्रायली हवाई दल आणि सैन्य या क्षेत्रातील लष्करी लक्ष्यांवर अचूक हल्ल्यांसह जमिनीवरील सैन्याला पाठिंबा देत आहेत. ही मोहीम मंजूर करण्यात आली असून राजकीय समुहाच्या निर्णयानुसार पार पडत आहेत. ऑपरेशन ‘नॉर्थन ऍरोज’ हे परिस्थितीजन्य मूल्यांकनानुसार आणि गाझा तसेच इतर क्षेत्रांमध्ये लढण्यासाठी समांतर चालू राहील. इस्रायली सैन्य युद्धाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रयत्न करत आहे. इस्रायलच्या नागरिकांचे रक्षण करण्यासाठी आणि उत्तर इस्रायलमधील नागरिकांना त्यांच्या घरी परतण्यासाठी आवश्यक ते सर्व सैन्य करत आहे, असं आयडीएफने स्पष्ट केलं आहे.
In accordance with the decision of the political echelon, a few hours ago, the IDF began limited, localized, and targeted ground raids based on precise intelligence against Hezbollah terrorist targets and infrastructure in southern Lebanon. These targets are located in villages…
— Israel Defense Forces (@IDF) September 30, 2024
हे ही वाचा :
धारावीतील मशिदीचे अनधिकृत बांधकाम काढण्यास सुरुवात!
कानपूरमध्ये पुन्हा ट्रेन उलटवण्याचा कट, रुळावर सापडला ‘अग्निसुरक्षा सिलेंडर’
सुनीता विल्यम्स यांचा पृथ्वीवर येण्याचा मार्ग मोकळा; नासाची टीम अंतराळात पोहोचली
इस्रायलने बेरूतमध्ये केलेल्या हल्ल्यात चार जण ठार
लेबनॉनस्थित हिजबुल्ला या दहशतवादी गटावर इस्रायलकडून वारंवार लक्ष्य केलं जात आहे. पेजर हल्ले, रेडिओ ब्लास्ट, हवाई हल्ले, गेल्या आठवड्यात हिजबुल्ला प्रमुख हसन नसराल्लाह याची हत्या आणि आता जमिनीवरून केलेलं आक्रमण अशा अनेक आघाडींवर इस्रायलने हिजबुल्लाचे कंबरडे मोडून ठेवले आहे. लेबनीज सरकारच्या म्हणण्यानुसार, हवाई हल्ल्यांमुळे सुमारे एक हजार नागरिक मारले गेले आणि दहा लाख लोकांना त्यांची घरे सोडून स्थलांतर केले आहे. तसेच अनेक हिजबुल्लाचे कमांडर्स ठारे झाले आहेत.