27 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरदेश दुनियाइस्रायल लष्कराच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुखांचा राजीनामा

इस्रायल लष्कराच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुखांचा राजीनामा

नैतिक जबाबदारी स्वीकारुन पद सोडणारे अहरॉन हलिवा इस्रायलचे पहिलेच अधिकारी

Google News Follow

Related

इस्रायल आणि हमास यांच्यामधील युद्ध दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असून शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. अशातच आता इस्रायल लष्कराच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख अहरॉन हलिवा यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. इस्रायलवर पहिल्यांदा झालेल्या हल्ल्याची माहिती मिळवता आली नाही त्यामुळे हे पद सोडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. इस्रायलवर हल्ले झाल्यानंतर त्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारुन पद सोडणारे अहरॉन हलिवा हे पहिलेच अधिकारी ठरले आहेत.

इस्रायलवर ७ ऑक्टोबर २०२३ मध्ये पहिल्यांदा हल्ला झाला होता. त्यानंतर इतरही हल्ले झाले. गुप्तचर विभागाला या हल्ल्यांची खबर नव्हती. या हल्ल्यांची माहिती योग्य वेळी माहिती मिळवू शकलो नाही त्यामुळे मी पद सोडतो आहे, असं गुप्तचर विभागाचे प्रमुख हलिवा यांनी स्पष्ट केलं आहे. हमासचा हल्ला आणि इतर कारवाया रोखण्यात अपयश आल्याने आणि त्याची माहिती न मिळाल्याने मेजर जनरल अहरॉन हलिवा यांनी पद सोडलं आहे.

इस्रायल लष्करातले महत्त्वाचे अधिकारी असलेल्या हलिवा यांच्या राजीनाम्यामुळे इस्रायल आता पुढचे कोणते पाऊल उचलणार याकडे जगाचे लक्ष असणार आहे. इस्रायलच्या लष्कराने हलिवा यांच्या राजीनाम्यानंतर एक पत्रक काढलं आहे. ज्यामध्ये लष्कराने असं म्हटलं आहे की, अहरॉन हलिवा यांनी हमास हल्ल्यांचा दोष आपल्या खांद्यावर घेतला. युद्ध सुरु झाल्यानंतर हलिवा यांनी जाहीरपणे सांगितले की आपण गुप्तचर विभागाचे प्रमुख असूनही हल्ल्यांचा डाव हाणून पाडण्यात आणि हमासला रोखण्यात अपयशी ठरलो. लष्कराने हलिवा यांचा राजीनामा स्वीकारल्याचंही पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

हे ही वाचा:

बिष्णोई गँगकडून जितेंद्र आव्हाडांना धमकी

अमेरिकेचा पाकला झटका, क्षेपणास्त्र निर्मितीसाठी मदत करणाऱ्या कंपन्यांवर बंदी!

बिहारच्या चंपारणमध्ये ‘लव्ह जिहाद’!

काँग्रेस बेकायदा, घुसखोर मुस्लिमांमध्ये संपत्तीचे वाटप करेल!

हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या सीमांवर स्फोट घडवले. क्षेपणास्त्र डागली. कशाचीही पर्वा न करता हल्ले करण्यात आले. ज्यामध्ये आत्तापर्यंत १२०० लोक ठार झाले आहेत. या १२०० पैकी अनेक सामान्य निरपराध नागरिक होते. गाझामध्ये २५० लोकांना ओलीस ठेवण्यात आलं आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात जेव्हा हमासकडून हल्ले सुरु झाले तेव्हाही अहरॉन हलिवांनी हे जाहीरपणे सांगितलं होतं की हमासने आत्तापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे. त्यांना काय करायचं होतं याचा आम्हाला गुप्तचर म्हणून थांगपत्ताही लागला नाही. गुप्तचर विभाग म्हणू जे अपयश आलं त्याची संपूर्ण जबाबदारी माझी आहे असंही अहरॉन हलिवा म्हणाले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा