इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध शमण्याचे नाव घेत नसून अजूनही हल्ले-प्रतिहल्ले दोन्ही बाजूंनी सुरूच आहेत. यात अनेक सामान्य नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशातच आता इस्रायलने हमासवर हवाई हल्ला केला आहे. यात भीषण जीवितहानी आणि वित्तहानी झाल्याची माहिती आहे.
पॅलेस्टिनी आरोग्य आणि नागरी आपत्कालीन सेवा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दक्षिण गाझा पट्टीवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात गाझाच्या दक्षिणेकडील रफाह शहरात ३५ पॅलेस्टिनी ठार झाले असून डझनभर नागरिक जखमी झाले आहेत. रफाहमध्ये शेकडो विस्थापित पॅलेस्टिनी राहतात ज्यांनी गेल्या वर्षी हमासच्या ७ ऑक्टोबरच्या हल्ल्याच्या विरोधात इस्रायलने युद्ध सुरू केल्यापासून गाझाच्या उत्तरेकडील भागातून पळ काढला होता.
इस्रायल लष्कराने मोठ्या प्रमाणात राफा शहरावर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. राफामध्ये प्रामुख्याने शरणार्थी छावण्यात पॅलिस्टिनी लोक राहतात. अशाच छावण्यांवर इस्राइलने क्षेपणास्त्र हल्ला केला. पॅलेस्टाईनच्या दाव्यानुसार, यात महिला आणि लहान मुलांचादेखील समावेश आहे.
हे ही वाचा:
पुणे अपघात: वेदांतच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल करणाऱ्या ससूनमधील दोन डॉक्टरांना अटक
पश्चिम बंगाल-ओडिशाच्या किनाऱ्यावर ‘रेमल चक्रीवादळ’ धडकण्याची शक्यता!
शिक्षिकेचा आवाज काढून सात विद्यार्थिनींवर बलात्कार
योगी आदित्यनाथ एकेकाची मस्ती उतरवण्यात वाकबगार आहेत!
दुसरीकडे इस्रायलने म्हटलं आहे की, “ आमच्या टीमला गुप्त माहिती मिळाली होती की, या छावण्यांमध्ये वेस्ट बँकचा हमासचा कमांडर आणि इतर अनेक अतिरेकी लपून बसले होते. या हल्ल्यामध्ये त्यांचा खात्मा झाला आहे.” मात्र, हमासने दावा केला आहे की, “शरणार्थी लोक राहत असलेल्या छावण्यांवर हा हल्ला झाला आहे. इस्राइल सैन्याने अशा ठिकाणांवर हल्ला केला आहे जिथे १५ दिवसांपूर्वी सामान्य लोकांनी हल्ल्यांपासून बचावासाठी आश्रय घेतला होता.” पॅल्स्टाईन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, “राफामधील हॉस्पिटलमध्ये आता नव्या रुग्णांना सामावून घेण्याची क्षमता नाही. त्यामुळे या हल्ल्यामध्ये मृत्यू आणि जखमी झालेल्या लोकांना कुठे दाखल करायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे.”