इस्रायल आणि गाझा यांच्यातील सुरू असलेले युद्ध शमण्याची चिन्हे दिसत नसून इस्रायलने आता गाझामधील सुरक्षित क्षेत्रात असणाऱ्या विस्थापितांच्या छावणीवर मोठा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवार, १० सप्टेंबर रोजी पहाटे इस्रायलने हा हल्ला केला असून या हल्ल्यात ४० जण ठार झाले आहेत. तर, ६० जण जखमी झाले आहेत. दरम्यान, हमासच्या दहशतवाद्यांना लक्ष्य केल्याचा दावा इस्रायलने केला आहे.
गाझा पट्टीतील मानवतावादी क्षेत्र म्हणून नियुक्त केलेल्या तंबूच्या छावणीवर इस्रायलकडून हल्ला करण्यात आला आहे. या हवाई हल्ल्यात ४० पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. तर ६० जण जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात हलविण्यात आले. रहिवासी आणि डॉक्टरांनी सांगितले की, या भागातील तंबूच्या तळावर चार क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. यानंतर जवळपास २० तंबूंना आग लागली आणि क्षेपणास्त्रांमुळे नऊ मीटर (३० फूट) इतके खोल खड्डे पडले.
इस्रायली सैन्याने एका निवेदनात म्हटले आहे की, गाझातील खान युनिसमधील सुरक्षित क्षेत्रातील छावणीवर हल्ला करण्यात आला. आम्ही सुरक्षित क्षेत्रातील हमासच्या कमांड सेंटरला लक्ष्य केले. हा हल्ला गाझाच्या मुख्य दक्षिणी शहर खान युनिसमधील अल-मवासीवर झाला, ज्याला युद्धाच्या सुरुवातीला इस्रायली सैन्याने सुरक्षित क्षेत्र घोषित केले होते, जेथे हजारो विस्थापित पॅलेस्टिनी आश्रय घेतला होता.
हे ही वाचा:
गणपती मंडपावर दगडफेक करणाऱ्यांना पोलिसांचा ‘प्रसाद’
४,२०० कोटी रुपये कोटी द्या नाहीतर… अदानी समुहाचा बांगलादेशला इशारा
दिल्लीत १ जानेवारीपर्यंत फटाके विक्री आणि खरेदीवर ‘पूर्ण बंदी’
वंदे भारत ट्रेनवर झालेल्या दगडफेकीमुळे लाखोंचे नुकसान !
इस्रायल डिफेन्स फोर्सेसने (आयडीएफ) म्हटले आहे की, “या मानवतावादी क्षेत्रामध्ये एम्बेड केलेल्या कमांड आणि कंट्रोल सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या हमासच्या महत्त्वपूर्ण दहशतवाद्यांना मारले आहे.” मात्र, हमासने या ठिकाणी त्यांचे सैन्य असलेल्या वृत्ताला नाकारले आहे. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला यात १,२०० लोक मारले गेले तेव्हा हे युद्ध सुरू झाले. यानंतर युद्धामुळे दोन्ही बाजूंचे मोठे नुकसान झाले असून मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झालेली आहे.