इस्रायल आणि हमास यांच्यात युध्द सुरू असताना आता आणखी एका देशात वादाची ठिणगी पडली आहे. इस्रायल आणि इराण या दोन देशांमध्ये आता नव्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या दोन्ही देशांचे संबंध पूर्वीपासूनच ताणलेले होते. आता इस्रायल-हमास युद्धानंतर हे संबंध आणखी बिघडले आहेत. अशातच सीरियामध्ये इराणी दूतावासाजवळ इस्रायलने मोठा हवाई हल्ला केला आहे. इस्रायलने सीरियातील इराणचे वाणिज्य दूतावास उद्ध्वस्त करून दोन इराणी जनरल आणि पाच अधिकारी ठार केले आहेत.
इस्रायली सैन्याने सीरिया आणि लेबनानमधील IRG फोर्सचा वरिष्ठ कमांडर मोहम्मद रजा जाहेदीला याचा खात्मा केला आहे. इस्रायलने या हल्ल्यावर कोणतीही टिप्पणी केलेली नाही. इस्रायली सैन्याने F-35 या स्टेल्थ फायटर जेटमधून इराणी दूतावासाच्या काऊन्सलर कार्यालयावर एका पाठोपाठ एक सहा मिसाईल्स डागल्या. यात मोहम्मद रजा जाहेदीचा मृत्यू झाला आहे. इस्रायलने केलेला हल्ला इतका भीषण होता की, दूतावास परिसरातील एक इमारत कोसळली आहे. सीरियाचे परराष्ट्र मंत्री फैसल मेकदाद यांनी या बॉम्बस्फोटाचा निषेध केला आहे.
इराणचे सीरियातील राजदूत होसेन अकबरी यांनी सांगितले की, हा हल्ला दूतावासाच्या संकुलातील काऊन्सलर इमारतीवर झाला. मृतांमध्ये मोहम्मद रझा जाहेदी, त्याच्या कुड्स फोर्सचा एक वरिष्ठ कमांडर, एक उच्चभ्रू परदेशी हेरगिरी आणि निमलष्करी शाखा आहे. इस्रायलने सीरियातील इराणच्या लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले आहे, परंतु त्यांच्या दूतावासाच्या परिसरावर हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ होती.
हे ही वाचा:
ताजमहाल नाही पहिली पसंती अयोध्या!
छिंदवाड्यात काँग्रेसला धक्का, विक्रम आहाके यांचा भाजपमध्ये प्रवेश!
सीतेच्या हातून रावणाला गोमांस; रामायणाची खिल्ली उडवणाऱ्या नाटकावर आक्षेप
दिल्लीत इंडिया आघाडीसोबत आणि बंगालमध्ये ममता म्हणतात, काँग्रेसला मत म्हणजे भाजपला मत
कोण होता मोहम्मद रजा जाहेदी?
जाहेदी इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या कुद्स फोर्समध्ये जाहेदी हा वरिष्ठ अधिकारी होता. IRGC-QF ही अमेरिकेने जाहीर केलेली दहशतवादी संघटना आहे. जाहेदीकडे सीरिया आणि लेबनानमधील युनिटची जबाबदारी होती. इराणी मिलिशिया आणि हिजबुल्लासोबत चर्चेची जबाबादारी त्याच्याकडे होती. सीरिया आणि लेबनानमधील इराणचा तो वरिष्ठ कमांडर होता. सीरिया, लेबनान आणि पॅलेस्टाइन क्षेत्रातील इस्रायल विरोधातील सर्व दहशतवादी कारवायांच जाहेदीने संचालन केलं होतं, असं इस्रायली आर्मी रेडिओने म्हटलं आहे.