भूकंपातून अजून सावरलेही नसतांना सिरियाला आणखी एका संकटाचा सामना करावा लागला आहे. इस्रायलने रविवारी सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये हवाई हल्ले केले आहेत. हवाई हल्ल्यांमध्ये निवासी भागाला लक्ष्य करण्यात आले आहे. या हल्ल्यात १५ लोक मारले गेले आणि अनेक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
राजधानी दमास्कसमध्ये स्थानिक वेळेनुसार मध्यरात्री १२.३० च्या सुमारास जोरात स्फोट ऐकू आले. सीरियाचे हवाई दल देखील दमास्कसच्या आसपासच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत आहे. दुसरीकडे, या हल्ल्याबाबत इस्रायलकडून तात्काळ कोणतेही वक्तव्य आलेले नाही. इस्त्रायलने अनेकदा दमास्कसच्या आसपासच्या भागांना याआधी लक्ष्य केले आहे.
तुर्की आणि सीरियामध्ये ६ फेब्रुवारीला७.८ रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप झाला होता. भूकंपामध्ये हजारो लोकांचे प्राण गेले असून मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. या भूकंपानंतर दोन आठवड्यांनी हा हल्ला करण्यात आला आहे.
दमास्कसवर यापूर्वी २ जानेवारीला हल्ला करण्यात आला होता त्यावेळी पहाटे इस्त्रायली सैन्याने पहाटे सीरिया राजधानीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर क्षेपणास्त्रे डागली होती. यामध्ये दोन सैनिक ठार आणि दोन जखमी झाले.
हे ही वाचा:
प्रियकराचे वैफल्य आईच्या जीवावर
तो आत्महत्या करणार होता,पण पोलिसांनी त्याला वाचवले!
गिरीश बापटांबद्दल राष्ट्रवादीला चिंता का?
नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली शपथ
इस्रायलने अलिकडच्या वर्षांत सीरियाच्या सरकार-नियंत्रित भागांमध्ये शेकडो हवाई हल्ले केले आहेत. एवढे सगळे करूनही इस्रायल या हल्ल्यांची जबाबदारी कधीच घेत नाही किंवा त्यावर चर्चाही करत नाही. इस्रायलने लेबनॉनच्या हिजबुल्लाहसारख्या इराण समर्थक अतिरेकी गटांना लक्ष्य करते असे कबूल केले आहे.