26 C
Mumbai
Wednesday, November 13, 2024
घरक्राईमनामाइस्रायलकडून गाझामधील शाळेवर हवाई हल्ला; १०० हून अधिक लोक ठार

इस्रायलकडून गाझामधील शाळेवर हवाई हल्ला; १०० हून अधिक लोक ठार

पूर्व गाझामधील शाळेवर हल्ला

Google News Follow

Related

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध शमण्याची चिन्हे दिसत नसून हमासचा प्रमुख हनिया याची हत्या झाल्यानंतरही इस्रायलने हल्ले थांबवलेले नाहीत. युद्धाची भीषणतां अधिक वाढत असून इस्रायलने शनिवारी गाझा पट्टीतील एका शाळेवर हवाई हल्ला केला. यात १०० हून अधिक लोक ठार झाले आहेत. तर, अनेक जण जखमी झाले आहेत.

इस्रायलकडून सातत्याने हमासच्या काही जागांवर लक्ष्य केले जात आहे. अशाच एका शाळेवर इस्रायलने हवाई हल्ला केला. पूर्व गाझामध्ये असलेल्या या शाळेत विस्थापित झालेले लोक राहत होते. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, “लोकांची प्रार्थना सुरु असताना इस्रायलने हा हल्ला केला. विस्थापित लोक या शाळेत राहत होते. फजर म्हणजे त्यांची सकाळची प्रार्थना सुरु असताना इस्रायलने हा हल्ला केला. शिवाय मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो” असं हमासकडून चालवल्या जाणाऱ्या गाझामधील सरकारी मीडिया समूहाने म्हटलं आहे.

यापूर्वीही इस्रायलने शाळेला लक्ष्य केले होते. गेल्या आठवड्यात गाझामधील चार शाळांवर इस्रायलने हल्ले केले होते. ४ ऑगस्टला गाझामधील दोन शाळांवर इस्रायलयने हल्ले केले होते. यात ३० जण ठार झाले होते. तर, काही जखमी झाले होते. त्याआधी ३ ऑगस्टला गाझामधील हमासच्या शाळेवर हल्ला झाला. त्यात १७ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते.

हे ही वाचा :

ब्राझीलमध्ये ६२ प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले; सर्व प्रवाशांसह क्रू मेम्बर्स दगावले

ऑलिम्पिकमध्ये भारताच्या कुस्तीची परंपरा कायम; अमन सेहरावतने जिंकले कांस्यपदक

अनिल देशमुखांच्या मागे पवार, ठाकरे !

“ऑलिम्पिक अपात्रता प्रकरणात विनेशसोबत कोणताही कट रचलेला नाही”

गतवर्षी ७ ऑक्टोबरला हमासच्या दहशतवाद्यांनी दक्षिण इस्रायलमध्ये घुसून हिंसाचार केला होता. शिवाय रॉकेट्सही डागले होते आणि युद्धाला तोंड फुटले होते. या दरम्यान, अनेकांना ठार करण्यात आले. तर, अनेक इस्रायली नागरिकांना बंधक बनवण्यात आले. अमानुष अत्याचार लोकांवर करण्यात आले होते. यानंतर इस्रायलने हमासला संपवण्याची शपथ घेतली. इस्रायलने हमास विरुद्ध युद्ध पुकारलं आणि मागच्या दहा महिन्यात या युद्धात ४० हजार पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा