इस्रायल आणि पॅलस्टाईनमधील युद्ध अजूनही सुरूचं असून गाझा पट्टीत शुक्रवार, १३ ऑक्टोबर रोजी रात्री इस्रायलने एअर स्ट्राइक केला. यामध्ये दहशतवादी संघटना हमासचा एक प्रमुख ठार झाला आहे. इस्रायसलमधल्या एका वर्तमानपत्राने या संबंधीचे वृत्त दिले आहे.
इस्रायली एअर फोर्सने एअर स्ट्राइकमध्ये हमासच्या एरियल फोर्सचा प्रमुख मुराद अबू मुराद याला ठार केले आहे. ज्या ठिकाणहून हमासच्या हवाई हल्ल्याची रणनिती आखली जायची, त्या ठिकाणीचं इस्रायली फोर्सने एअर स्ट्राइक केला. यामध्ये या प्रमुखाचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
गेल्या शनिवारी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये घुसून हल्ला केला. अनेक निष्पाप नागरिकांची हत्या केली. अबू मुराद याने या दहशतवाद्यांना मार्गदर्शन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. हमास कमांडो फोर्सच्या वेगवेगळ्या ठिकाणांना इस्रायली एअर फोर्सने लक्ष्य केलं आहे. इस्रायलकडून हमासवर सातत्याने हवाई हल्ले सुरु आहेत. गाझा पट्टीतील हमासच्या ठिकाणांना लक्ष्य केलं जात आहे.
हे ही वाचा:
मणिपूर विद्यार्थी हत्याकांड प्रकरणातील मास्टरमाइंडला पुण्यातून अटक
इस्रायलकडून गाझामध्ये छापे; ‘ही तर केवळ सुरुवात’ नेतान्याहू यांचा इशारा
गाझात आकाशातून पत्रके पडली, ११ लाख पॅलेस्टिनींना विस्थापित होण्याच्या सूचना
डोंबिवलीतील शाळेच्या शिक्षिकेकडून ५० ते ६० विद्यार्थ्यांना बेदम मारहाण!
हमासने इस्रायलवर केलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात शेकडो इस्रायली नागरिक ठार झाले आहेत. या भीषण हल्ल्यात इस्रायलमध्ये आतापर्यंत १ हजार ३०० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलकडून प्रत्युत्तर म्हणून सुरु असलेल्या हवाई हल्ल्यात गाझा पट्टीत आतापर्यंत १ हजार ५३० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलच्या हद्दीत हमासचे १ हजार ५०० दहशतवादी ठार झाले आहेत.