रशिया युक्रेन युद्धात इस्त्रायल करणार मध्यस्थी!

रशिया युक्रेन युद्धात इस्त्रायल करणार मध्यस्थी!

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या १९व्या दिवशी म्हणजेच काल चर्चेची चौथी फेरी झाली. तरी आजही दोन्ही देशांमधील ही चर्चा सुरु राहणार आहे. मात्र या दोन्ही देशांमधील युद्धात शांतात निर्माण करण्यासाठी इस्त्रायल सरकार पुढे आले आहे.

युद्धात शांतता निर्माण करण्यासाठी मध्यस्थी करणार असल्याचे इस्त्रायल सरकारने जाहीर केले आहे. असे इस्त्रायलचे राष्ट्रपती प्रशासनाचे प्रमुख आंद्रे येरमॅक यांनी सोमवारी फेसबुकच्या माध्यमातून सांगितले आहे. फेसबुकवर येरमॅक यांनी जाहीर केले की, इस्त्रायलने रशिया आणि युक्रेनमध्ये मध्यस्थ म्हणून काम करण्यासाठी ‘जटिल परंतु उदात्त’ हे मिशन हाती घेतले आहे.

सोमवारी झालेल्या चर्चेत दोन्ही देशांमध्ये सामंज्यस्याचा कोणताही मार्ग निघू शकला नाही. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी युद्ध संपवून शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून इस्त्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांची भेट घेतली. त्यानंतर इस्त्रायल सरकारने या युद्धात मध्यस्थी करणार असल्याचे जाहीर केले आहे.

युक्रेन रशिया युद्धात इस्त्रायलने आतापर्यंत कोणत्याही देशाची बाजू घेतलेली नाही. इस्त्रायल सरकारने युक्रेनला मानवतावादी दृष्टीकोनातून मदत म्हणून शंभर टन साहित्याचा पुरवठा केला होता. या साहित्यात इस्त्रायलने कोणतेही लष्करी साहित्य युक्रेनला पुरविलेले नाही. रशियाच्या हल्ल्यांमुळे होणाऱ्या हानीबाबत इस्त्रायल सरकारने वारंवार चिंता व्यक्त केली असली तरी रशिया सरकारचा निषेध मात्र केलेला नाही.

हे ही वाचा:

शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्य; कर्नाटक उच्च न्यायालयाचा निकाल

राम गोपाल वर्मा म्हणतो काश्मीर फाईल्स नंतर ‘विवेक’वूड

अनेक राज्यांत ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट करमुक्त!

फडणवीसांनी फोडला दुसरा बॉम्ब! ‘न्यूज डंका’ च्या हाती एक्सक्ल्युझिव्ह ध्वनिफीत

दरम्यान, या युद्धात युक्रेनने डागलेल्या क्षेपणास्त्रामुळे २० लोक मारले गेले आणि २८ जखमी झाले आहेत. जीवितहानी होत असल्यामुळे युरोपियन देशांनी आणि अमेरिकेने युक्रेनला शस्त्रास्त्रे देण्यास सुरवात केली आहे. आज रशियन सैन्याने कीवमध्ये केलेले दोन स्फोट इतके जोरदार होते की किवच्या नैऋत्येकडील खिडक्यांच्या काचा फुटल्या.

Exit mobile version