30 C
Mumbai
Wednesday, January 1, 2025
घरदेश दुनियागाझातील रुग्णालयांमधून नवजात अर्भकांच्या सुटकेसाठी इस्रायल तयार

गाझातील रुग्णालयांमधून नवजात अर्भकांच्या सुटकेसाठी इस्रायल तयार

शिफा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी या अर्भकांना अन्य दुसऱ्या सुरक्षित रुग्णालयात नेण्याची विनंती

Google News Follow

Related

इस्रायल आणि हमासमधील तीव्र संघर्षामुळे गाझा पट्टीमधील नागरिकांची विशेषतः लहान मुलांची होरपळ होत आहे. इंधन तुटवड्यामुळे गाझामधील अल शिफा रुग्णालयातील दोन नवजात अर्भकांचा मृत्यू झाला असून आणखी डझनभर मुले मृत्यूशी झुंजत असल्याचे पॅलिस्टाइनच्या प्रशासनाने सांगितल्यानंतर इस्रायलने या मुलांच्या सुटकेची तयारी दर्शवली आहे.

 

इस्रायलचे सैन्य रविवारी या लहान मुलांच्या सुटकेच्या प्रक्रियेत मदत करेल, असे इस्रायल लष्कराच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले.
हमासकडून २४९ ओलिसांची सुटका होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनीही कोणत्याही परिस्थितीत युद्धविराम होणार नाही, असे जाहीर केले आहे. इस्रायलच्या सैन्यदलाने गाझामधील प्रमुख रुग्णालयाला वेढा घातला असून हल्ल्यांची तीव्रता वाढवली आहे.

हे ही वाचा:

आयसीसचे काम केल्याप्रकरणी अलिगढ विद्यापीठाच्या सहा जणांना अटक!

मुंब्र्यात आव्हाडांच्या घोषणा…उद्धव ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है!

१५ किलो औषधं, भाजीपाला घेऊन पहिला ड्रोन दुर्गम भागात पोहचला

मोबाईल खाली पडला असे सांगत सी लिंकवरून मारली उडी!

गाझामधील सर्वांत मोठे रुग्णालय असणाऱ्या अल शिफा रुग्णालयातील इंधन संपल्यामुळे दोन नवजात अर्भकांचा मृत्यू झाला तर, डझनभर रुग्ण अत्यवस्थ असल्याचे पॅलिस्टिनी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. इस्रायली लष्कराने मात्र आम्ही रुग्णालयांना लक्ष्य करत नसल्याचा दावा केला असून लहान मुलांच्या सुटकेची तयारी दर्शवली आहे.

 

शिफा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी या अर्भकांना अन्य दुसऱ्या सुरक्षित रुग्णालयात नेण्याची विनंती केली असून आम्ही आवश्यक ती मदत पुरवत आहोत, असे इस्रायलच्या लष्करी प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही (डब्लूएचओ) अल शिफा रुग्णालयाशी संपर्क तुटल्याचे जाहीर केले असून तेथे अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच, त्वरित युद्धविरामाची घोषणा करावी, असे जाहीर केले आहे. रियाध येथे शनिवारी झालेल्या इस्लामिक-अरब परिषदेतही इस्रायलने त्वरित गाझामधील लष्करी कारवाई थांबवावी, असे आवाहन केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
218,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा