इस्रायलने आता हमासविरुद्धचा लढा तीव्र केला आहे. त्यांनी सोमवारी रात्रभर गाझा पट्टीमध्ये घुसून छापेमारीला सुरुवात केली असताना आता त्यांनी हवाईहल्ल्यांची तीव्रताही वाढवली आहे. अनेक पाश्चिमात्य देशांनी इस्रायलच्या स्वसंरक्षणासाठीच्या या लढ्याचे समर्थन केले आहे. आता इस्रायल गाझा पट्टीमध्ये कधीही एकाचवेळी आकाश, जमीन आणि समुद्र अशा तिन्ही मार्गाने संयुक्त हल्ल्याला सुरुवात करू शकते, असे इस्रायलचे संरक्षण मंत्री योआव गॅलंट यांनी सोमवारी स्पष्ट केले.
इस्रायलच्या या स्वसंरक्षणार्थ हल्ल्याला अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यासह कॅनडा, फ्रान्स. जर्मनी, इटली आणि ब्रिटनच्या नेत्यांनीही पाठिंबा दिला आहे. इस्रायलच्या संरक्षण दलाने हमासशासित गाझा पट्टी आणि दक्षिण लेबेनॉन येथे हल्ल्याची तीव्रता वाढवली आहे. तसेच, त्यांनी सिरिया आणि वेस्ट बँकवरही हल्ल्यांना सुरुवात केली आहे.
आतापर्यंत या युद्धात गाझामधील चार हजार ७४१ लोकांचा बळी गेला असून १६ हजार जण जखमी झाले आहेत. तर, ९३ पॅलिस्टिनी नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. हमासने इस्रायलच्या भूभागावर हल्ले करू नयेत, यासाठी इस्रायलच्या संरक्षण दलातर्फे हमासच्या दहशतवादी तळांवर हल्ले केले जात आहेत. इस्रायलने दक्षिण लेबेनॉन भागातील ङेजोबोल्लाह या दहशतवादी संघटनेचे प्राबल्य असलेल्या भागांना लक्ष्य करून जोरदार बॉम्बवर्षाव केला.
हे ही वाचा:
दसऱ्यानिमित्त भारत- चीन सीमेवर शस्त्रपूजन
तालिबानला खुपतोय अफगाणिस्तानचा विजय
पराभवानंतर सेहवागने काढली पाकिस्तानच्या संघाची लाज
‘हिरण्यकश्य हा चित्रपट माझ्यासाठी आणि भारतीय चित्रपटसृष्टीसाठी मैलाचा दगड ठरेल’
इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनीही लष्कराचे वरिष्ठ अधिकारी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाची चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला आणि जमिनीवरील लढाईसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. गाझा पट्टीतील मध्य भाग आणि उत्तर भागांवर हल्ले केले. जबालिया निर्वासितांच्या तळावर केलेल्या हल्ल्यात ३० जण ठार तर, अनेकजण जखमी झाल्याचे वृत्त अल जझीरा वृत्तपत्राने दिले आहे.