इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये पुन्हा संघर्षाला तोंड फुटले असून दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले सुरु झाले आहेत. सोमवारी हमासने इस्रायलच्या दिशेने १०० क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्याला इस्रायलकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले. यामध्ये २० पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये एकाच दिवसात इतका रक्तपात झाल्याची ही पहिलीच घटना आहे, असे पॅलेस्टिनी आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. पॅलेस्टाईनने हल्ला केल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावे लागले, असे इस्रायलचे म्हणणे आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र संघटनेने आपातकालीन बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत संयुक्त राष्ट्रसंघटनेने इस्रायलला काही सूचना केल्या. इस्रायलने संयम बाळगावा. तसेच ऐतिहासिक पवित्र स्थळांचा आदर करण्यात यावा, असे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले.
जेरूसलेमच्या अक्सा मशिदीबाहेर सोमवारी निदर्शने करण्यात आली. यावेळी इस्रायली पोलीस आणि पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला. यामध्ये शेकडो लोक जखमी झाले आहेत. त्यानंतर हमास संघटनेने इस्रायलला प्रत्युत्तर देण्याची भाषा सुरु केली.
इस्रायलने जेरूसलेममध्ये राहणाऱ्या पॅलेस्टिनी नागरिकांना घरे खाली करण्यास सांगितले आहे. जेणेकरून याठिकाणी यहुदी नागरिकांना राहता येईल. यावरुन पॅलेस्टिनी नागरिक इस्रायलमध्ये सातत्याने निदर्शने करत आहेत.
हे ही वाचा:
तुमच्या मुलांना शाखेत पाठवा, देश वाचवा
मुस्लिम संघटनांसोबतची आघाडी काँग्रेसला भोवली
कोविड काळात काझीच्या अंतिम दर्शनासाठी हजारोंची गर्दी
७० हजार कोटींच्या ठेवी असलेल्या पालिकेने मोफत लसीकरणाचा बोजा उचलावा
इस्रायलने १९६७ साली मध्यपूर्वेतील युद्धानंतर जेरूसलेम ताब्यात घेतले होते. त्यानंतर इस्रायलयने हा परिसर यहुदी लोकांचा देश म्हणून घोषित केल होता. तेव्हापासून पॅलेस्टिनी नागरिक इस्रायलविरोधात संघर्ष करत आहेत. पॅलेस्टाईन स्वतंत्र होईल तेव्हा जेरुसलेम ही आमची राजधानी असेल, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, आता इस्रायलने जेरुसलेममध्ये राहणाऱ्या पॅलेस्टिनी नागरिकांनाच बाहेर काढायला सुरुवात केली आहे.