इस्रायल आणि गाझा पट्टीमधील हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्ध दरम्यान आता इस्रायलने लेबनॉनमधील दहशतवादी गट असलेल्या हिजबुल्लाह विरोधात युद्ध पुकारले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये इस्रायलने हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांना चांगलेच दणके दिले असून त्यांचे कंबरडे मोडले आहे. मंगळवारी पेजर ब्लास्ट, बुधवारी वॉकी-टॉकी ब्लास्ट, गुरुवारी एअर स्ट्राइक आणि शुक्रवारी एअर स्ट्राइक असे एकापाठोपाठ एक हल्ले करुन इस्रायलने हिजबुल्लाहची कोंडी करून टाकली आहे. दरम्यान, इस्रायली सैन्याने शुक्रवारी लेबनॉनची राजधानी असलेल्या बेरुतवर हवाई हल्ला केला. यात इस्रायल ला मोठे यश मिळाले आहे. हिजबुल्लाहचा टॉप कमांडर या हल्ल्यात मारला गेल्याची माहिती समोर आली आहे. इब्राहिम अकील असे त्याचे असून त्याच्यासह सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ५९ जण जखमी झाले आहेत.
इस्रायलच्या सैन्यदलाने शुक्रवारी बैरुतवर केलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहचा प्रमुख कमांडर इब्राहिम अकील ठार झाल्याची माहिती इस्रायलने दिली आहे. बैरुतच्या दक्षिण उपनगरांत इस्रायलने शुक्रवारी जोरदार हवाई हल्ले केले. अकीलने हिजबुल्लाहच्या एलिट रडवान फोर्स आणि जिहाद कौन्सिल या लष्करी गटांचा प्रमुख म्हणून काम केले आहे. बैरूतमधील अमेरिकी दूतावासावर १९८३ मध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्यात अकिलचा हात असल्याचा आरोप अमेरिकेने केला होता.
We can now confirm that Ibrahim Aqil was eliminated together with other senior terrorists in Hezbollah’s Radwan Forces pic.twitter.com/6FyXQOzAex
— Israel ישראל (@Israel) September 20, 2024
एप्रिल १९८३ मध्ये बेरुत येथील अमेरिकन दूतावासावर बॉम्ब हल्ला झाला होता. त्याची जबाबदारी इब्राहीम अकीलने घेतली होती. या हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू झाला होता. ऑक्टोबर १९८३ मध्ये यूएस मरीन कॉर्प्स बॅरकवर झालेल्या हल्ल्यात २४१ अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी अकीलने अमेरिकन आणि जर्मन नागरिकांना बंधक बनवण्याचा आदेश दिला होता. अमेरिकेने एप्रिल २०२३ मध्ये त्याच्याविषयी माहिती देणाऱ्याला सात मिलियन डॉलर म्हणजे जवळपास ६० कोटी रुपयांचे बक्षीस घोषित केले होते.
हे ही वाचा :
एफएटीएफने दहशतवाद विरोधी भारताच्या प्रयत्नांचे केले कौतुक, गंभीर धोक्याचा इशाराही दिला!
अरेच्चा! बघता बघता ट्रकला रस्त्याने गिळले
नितेश राणे यांचा किरीट सोमय्या करू नका!
‘बेस्ट’च्या कंडक्टरवर धावत्या बसमध्ये चाकूहल्ला, पैसे लुटले, मोबाईल हिसकावला!
इस्रायल आणि लेबनॉन या देशांनी शुक्रवारी एकमेकांवर हल्ले केले. इस्रायल आणि हमास यांच्यात गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ११ महिन्यांहून अधिक काळ लेबनीज दहशतवादी गट हिजबुल्लाह आणि इस्रायली सैन्यांमध्ये संघर्ष सुरु आहे. या युद्धात सीमेच्या दोन्ही बाजूंनी हजारो लोक बेघर झाले आहेत.