इस्रायलचे मुंबईतील काँसुल जनरल याकोव फिंकलश्टाइन यांनी एका व्हिडीओ संदेशाद्वारे इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरु असलेल्या संघर्षावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी आमची लढाई ही दहशहतवादाच्या विरोधात आहे आणि आम्ही दहशतवादाला जिंकू देऊ शकत नाही असे याकोव यांनी म्हटले आहे. मुंबई असो किंवा तेल अवीव दहशतवाद हा दहशतवाद आहे असे याकोव फिंकलश्टाइन यांनी म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून मध्य आशियातील इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडली आहे. पॅलेस्टाईनमधील हमास या दहशतवादी संघटनेकडून इस्रायलमध्ये रॉकेट्स सोडली जात आहेत तर इस्रायलकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहेत. पण या संपूर्ण संघर्षात अनेक निष्पाप लोकांचे हकनाक जीव गेले आहेत. यात काही भारतीयांचाही समावेश आहे. अशीच एक निष्पाप भारतीय म्हणजे सौम्या संतोष. केरळ मधील नर्स असलेली सौम्या इस्रायलमध्ये होती आणि हमासच्या रॉकेट हल्ल्यात तिचा दुर्दैवी अंत झाला.
हे ही वाचा:
भाजपाच्या प्रभावाने करदात्यांचे कोट्यवधी रुपये वाचले
भारताने इस्रायलविरोधी भूमिका घ्यावी-काँग्रेस
६ कोटी रुपये नक्की कोणाकडे जाणार होते? सरकारने उत्तर द्यावे
‘सोशल’ दबावामुळे अखेर ‘सोशल’ उधळपट्टीचा निर्णय रद्द
या सगळ्या प्रकारावर याकोव फिंकलश्टाइन यांनी भाष्य केले आहे. हमासच्या रॉकेट हल्ल्यात सौम्या संतोष हिचा झालेला मृत्यू दुर्दैवी आहे. गाझापट्टीतील हमासच्या दहशतवादी हल्ल्यात इस्रायलमधील हजारो बायका, मुले मारली गेली आहेत. हमासच्या या दहशतवादी हल्ल्यात गाझामधील सामान्य जनता पण होरपळत आहे. हमासने डागलेल्या सुमारे हजार रॉकेट्सपैकी अंदाजे दोनशे रॉकेट्स गाझापट्टीतच फुटली. हमासची लोक दुहेरी गुन्हा करत आहेत. ते गाझामधील सामान्य नागरिकांना मानवी ढाल म्हणून वापरात आहेत आणि इस्रायलच्या बायका-पोरांना लक्ष्य करत आहेत. इस्रायल फक्त स्वसंरक्षण करत आहे. स्वतःचे सार्वभौम अबाधित ठेवण्यासाठी. दुर्दैवाने भारतीयांना माहित्ये दहशतवाद काय असतो. मुंबई असो किंवा तेल अवीव दहशतवाद हा दहशतवादाचं आहे. आम्ही दहशतवादाला जिंकू देऊ शकत नाही. आम्ही विजय मिळवू असे याकोव फिंकलश्टाइन यांनी म्हटले आहे