इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी प्रथमच कबूल केले आहे की, सप्टेंबरमध्ये लेबनॉनस्थित हिजबुल्लाच्या पेजर स्फोटामागे इस्रायलचा हात होता. नेतन्याहू यांनी कॅबिनेटच्या साप्ताहिक बैठकीदरम्यान ही कबुली दिली. सप्टेंबरमध्ये, लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या सैनिकांकडील हजारो पेजर एकाचवेळी फुटले होते. यात सुमारे ४० दहशतवादी ठार झाले होते तर, तीन हजाराहून अधिक जखमी झाले होते.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी रविवारच्या साप्ताहिक मंत्रिमंडळ बैठकीत प्रथमच कबूल केले की, हिजबुल्लाच्या पेजर आणि वॉकी- टॉकीवरील हल्ल्यांमागे इस्रायलचा हात होता. १७ आणि १८ सप्टेंबर रोजी केलेल्या हल्ल्यांमध्ये लेबनॉन आणि सीरियामध्ये हिजबुल्ला सदस्यांनी वापरलेल्या हजारो हॅन्डहेल्ड पेजर आणि शेकडो वॉकी- टॉकींना लक्ष्य करण्यात आले होते. पेजर ऑपरेशन आणि (हिजबुल्ला नेता हसन) नसरल्लाहचा खात्मा संरक्षण आस्थापनातील वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय पातळीवर जबाबदार असलेल्यांच्या विरोधाला न जुमानता करण्यात आला, असे नेतन्याहू यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितले.
हे ही वाचा:
काँग्रेसकडून २८ बंडखोरांवर कारवाईचा बडगा
न्यूटन, गॅलिलिओपेक्षाही समकालिन शिवाजी महाराज, महाराणाप्रताप बुद्धिमान, तेजस्वी
अफजलखान वध म्हणजेच शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने साजरा होणार शिवप्रताप सप्ताह
मुंबई विभाग शालेय ऍथलेटिक्समध्ये ठाणे मनपा ऍथलेटिक्स योजनेतील मुलांचे यश
रविवारी, १० नोव्हेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत, नेतन्याहू यांनी हे देखील कबूल केले की इस्रायली सैन्याने बेरूतमध्ये अचूक हल्ला केला आणि त्याच्याकडून थेट आदेश मिळाल्यानंतर हिजबुल्ला प्रमुख हसन नसराल्लाहला ठार मारले. या वर्षी १७ ते १८ सप्टेंबर दरम्यान, इराण- समर्थित दहशतवादी गट, हिजबुल्लाहने वापरलेल्या हजारो पेजर आणि वॉकी- टॉकींचा स्फोट झाला होता. सर्वत्र खळबळ यामुळे उडाली होती. सुमारे ४० लोक मारले गेले होते आणि तीन हजाराहून अधिक जखमी झाले होते.