27 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरदेश दुनियालक्षद्वीप मुद्द्यावरून इस्रायल भारताच्या पाठीशी; मोठ्या प्रकल्पाची घोषणा

लक्षद्वीप मुद्द्यावरून इस्रायल भारताच्या पाठीशी; मोठ्या प्रकल्पाची घोषणा

भारतातील इस्रायली दूतावासाकडून लक्षद्वीपचे फोटो शेअर

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप दौऱ्यानंतर तिकडचे काही फोटो शेअर केले. यावरून वादंग उठला असून मालदीवच्या काही मंत्र्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपमानास्द टिप्पणी केली. सध्या दोन्ही देशांमध्ये तणाव असला तरी या वादात भारतीयांनी मालदीवला आपली ताकद दाखवून दिली आहे. भारताच्या आक्रमक भूमिकेनंतर मालदीवला बॅकफूटवर जाव लागलं. मालदीवने कारवाई करत तीन मंत्र्यांची हकालपट्टी केली. दरम्यान दुसऱ्याबाजूला मालदीव बरोबरच्या या वादात भारताच्या जुन्या मित्राने भारताच्या पाठीवर हात ठेवत आपण सोबत असल्याचे दाखवून दिले आहे.

या मुद्द्यावर इस्रायल भारतासोबत उभा राहिला आहे. इस्रायलने लक्षद्वीपच्या नैसर्गिक सौंदर्याच भरभरुन कौतुक केलं आहे. यासोबतच लक्षद्वीपबद्दल इस्रायलने मोठी घोषणा केली आहे. या केंद्रशासित प्रदेशात समुद्राचे पाणी स्वच्छ करण्याच्या प्रकल्पावर काम सुरू करत असल्याची इस्रायलने घोषणा केली आहे.

भारतातील इस्रायली दूतावासाने आपल्या एक्स हँडलवर लक्षद्वीपचे काही फोटो शेअर केले आहेत. “डिसेलिनेशन प्रोजेक्ट सुरु करण्याच्या भारत सरकारच्या विनंतीवरुन आम्ही मागच्यावर्षी लक्षद्वीपला गेलो होतो. इस्रायल या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी तयार आहे. हे फोटो त्या लोकांसाठी आहेत, जे अजूनपर्यंत लक्षद्वीपच सौंदर्य पाहू शकलेले नाहीत. या फोटोंमधून तुम्ही मनमोहक, आकर्षक दृश्य पाहू शकता,” असं इस्रायलने म्हटलं आहे.

हे ही वाचा:

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर टांगती तलवार

पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करणारे मालदीवचे तीन मंत्री निलंबित

मालदीव मंत्र्यांच्या आक्षेपार्ह टिप्पणीबाबत स्थानिक नेत्यांमध्येच रोष

वसंत मार्वलमध्ये अय्यप्पा पूजनातून एकात्मतेचा संदेश

डिसेलिनेशन म्हणजे काय?

लक्षद्वीप एक बेट असल्यामुळे तिथे पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. इस्रायलकडे समुद्राच खारं पाणी गोड्या पाण्यामध्ये बदलण्याचे तंत्रज्ञान आहे, त्याला डिसेलिनेशन म्हणतात. खाऱ्या पाण्यातून खनिज आणि अन्य अशुद्ध घटक बाजूला करुन ते पाणी पिण्यायोग्य बनवलं जातं. इस्रायलला समुद्राने वेढलेलं असून तिथेही पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. त्यामुळे त्यांनी हे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा