गाझाच्या नास्सेर हॉस्पिटल संकुलात लपलेल्या दहशतवाद्यांवर इस्रायलचा हल्ला

इस्रायलवर हल्ले करण्यासाठी हॉस्पिटलचा वापर केला जात असल्याचा आरोप

गाझाच्या नास्सेर हॉस्पिटल संकुलात लपलेल्या दहशतवाद्यांवर इस्रायलचा हल्ला

इस्रायलने पुन्हा एकदा हमासच्या ठिकाणांना लक्ष्य केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात हमासच्या नेत्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. इस्रायल डिफेन्स फोर्सेस (IDF) ने या संदर्भात वृत्त दिले आहे.

इस्रायल डिफेन्स फोर्सेस (IDF) ने गाझाच्या नास्सेर हॉस्पिटल संकुलात असलेल्या हमासच्या एका दहशतवाद्यावर लक्ष्यभेदी हल्ला केल्याची घोषणा केली. त्यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले की, “गाझाच्या नास्सेर हॉस्पिटल संकुलात लपलेल्या एका प्रमुख हमास दहशतवाद्यावर लक्ष्यभेदी हल्ला करण्यात आला. हा हल्ला विस्तृत गुप्तचर माहिती संकलनानंतर आणि अत्यंत अचूक क्षेपणास्त्रांच्या मदतीने करण्यात आला, जेणेकरून परिसराला कमीत कमी हानी होईल.”

इस्रायली सैन्याने हमासवर नागरिक ठिकाणांचा आडोसा घेण्याचा आरोप करत सांगितले की, “हमास रुग्णालयासारख्या नागरी पायाभूत सुविधांचा गैरवापर करीत असून, गाझातील लोकांचे जीव धोक्यात घालत आहे. इस्रायलवर हल्ले करण्यासाठी नास्सेर हॉस्पिटलचा वापर केला जात होता, हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे सरळ उल्लंघन आहे.”

इस्रायली सैन्याने आणखी दोन प्रमुख हमास कमांडरना ठार केल्याची माहिती दिली आहे. हमासच्या गाझा ब्रिगेडचा उपकमांडर आणि शेजैय्या बटालियनचा कमांडर. ठार झालेले अहमद सलमान ‘अव्ज शिमाली’ हे हमासच्या गाझा ब्रिगेडच्या सैन्य रणनीती आणि आक्रमण योजनेसाठी जबाबदार होते. त्याचबरोबर, जमील ओमर जमील वाडिया हा शेजैय्या बटालियनच्या सैन्य पुनर्रचनेसाठी आणि इस्रायली सैन्याविरुद्ध हल्ल्यांसाठी जबाबदार होता.

अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी इस्रायल- हमास संघर्षात हमासला जबाबदार धरले आहे. अमेरिका इस्रायलसोबत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. दुसरीकडे, हमासने आरोप फेटाळत म्हटले की, आम्ही युद्धविरामाच्या सर्व प्रस्तावांना सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र, इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी कराराची अंमलबजावणी नाकारली. दुसरीकडे इस्रायलने बेइत हनून आणि राफाहमध्ये हवाई आणि जमिनीवरून हल्ले सुरू ठेवले आहेत. तसेच, लेबनॉनमध्येही हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर हवाई हल्ले करण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

नागपूर हिंसाचारातील मास्टरमाइंड फहीम खानच्या घरावर चालणार बुलडोझर?

एकनाथ शिंदेंबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याने कुणाल कामराचा स्टुडिओ फोडला!

समीर वानखेडे यांची एण्ट्री सालियन प्रकरणाला देणार नवे वळण

निवडून न येणारे विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात!

गाझा आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आतापर्यंत गाझामध्ये ५०,०२१ लोकांचा मृत्यू झाला असून १,१३,२७४ लोक जखमी झाले आहेत. गाझा सरकारच्या मीडिया कार्यालयाने हा आकडा ६१,७०० पेक्षा अधिक असल्याचे म्हटले आहे. इस्रायलमध्ये ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यात १,१३९ लोक ठार, तर २०० हून अधिक जणांचे अपहरण करण्यात आले होते.

वसुली तर होईलचपण दहशत  कधी ठेचणार? | Mahesh Vichare | Nagpur Violence |

Exit mobile version