इस्रायलने पुन्हा एकदा गाझा शहरावर हवाई हल्ला केला आहे. गाझामधील शाळेवर इस्रायलने हल्ला केला असून या हल्ल्यात सुमारे २७ लोक ठार झाल्याची माहिती आहे. इस्रायलने दावा केला आहे की, या शाळेच्या कंपाऊंडमध्ये हमासचे अतिरेकी राहत होते. मात्र, स्थानिक माध्यमांनी सांगितले की, शाळेमध्ये युद्धामुळे विस्थापित झालेल्या लोकांना आश्रय देण्यात येत होत होता.
इस्रायलचे प्रमुख नेतन्याहू आणि त्यांच्या सैन्याने गाझा आणि रफाहवर त्यांचे हल्ले सुरूच ठेवले आहेत. यावेळी इस्रायली लष्कराने मध्य गाझा पट्टीतील नुसरत कॅम्पमध्ये राहणाऱ्या निरपराध लोकांना लक्ष्य करत हवाई हल्ले केले. शाळेवर झालेल्या हल्ल्यात सुमारे २७ पॅलेस्टिनी नागरीक ठार झाले आहेत. तर, अनेक जखमी झाले आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये बहुतांश लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे.
इस्रायलने दावा केला आहे की, मध्य गाझामधील नुसेरात येथील संयुक्त राष्ट्रांच्या शाळेत हमासची छुपी कमांड पोस्ट आहे. या शाळेत ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवरील हल्ल्यात सामील असलेल्या हमासच्या सैनिकांना ठेवण्यात आले होते.
हे ही वाचा:
अयोध्येतील पराभवानंतर रामायणातील ‘लक्ष्मण’ नाराज
अवघी २.५ टक्के मते, आठ जागांवर विजय
बायडेन-सुनक आणि पुतिन यांनी केले मोदी यांचे अभिनंदन
आज शिवाजी राजा झाला…! रायगड ऐतिहासिक सोहळ्यासाठी सुसज्ज
माहितीनुसार, इस्रायली लढाऊ विमानाने किमान तीन शाळेच्या वर्गांवर बॉम्बहल्ले केले त्यामध्ये अनेक लोक मारले गेले आहेत. इस्राइलचे हल्ले मध्य गाझा येथील एका शाळेवर झाले. या शाळेत शेकडो पॅलेस्टिनींनी आश्रय घेतला आहे. हमास संचालित गाझा सरकारच्या मीडिया कार्यालयाने एका निवेदनात शाळेवरील इस्रायली हल्ल्याचा निषेध केला आणि या हल्ल्याला भयानक नरसंहार असे म्हटले आहे. या घटनेवर इस्रायली बाजूने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.