रशिया युक्रेनचे युद्ध अजून संपायची चिन्हे दिसत नसताना इस्रायल आणि इराणमध्ये युद्धाचे ढग जमू लागल्याचे चित्र आहे. मंगळवार, ३१ ऑगस्ट रोजी रात्री इस्रायलने सीरियावर हल्ला केल्याचा दावा सिरियाकडून करण्यात आला आहे.
सीरियामधील अलेप्पो विमानतळासह राजधानीजवळ हवाई हल्ला केल्याचा आरोप सीरियानं केला आहे. इस्रायलने मिसाईल आणि शस्त्रास्त्रं घेऊन इराणच्या विमानांना लक्ष्य केल्याचा सीरियाचा आरोप आहे. सीरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेनं या संबंधित माहिती दिली आहे.
अलेप्पो आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिला हल्ला करण्यात आला. तर दुसरा हल्ला राजधानी दमस्कसजवळ करण्यात आला. त्यामुळे आता या दोन देशांवर युद्धाचे ढग पसरल्याचे चित्र आहे.
हे ही वाचा:
सर्वोत्कृष्ट मंडळाला मिळणार पाच लाख
जेष्ठ नागरिकांचा ‘त्या’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटणार
सीरियामध्ये काही ठिकाणी गोळीबार झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. इस्रायलकडून यावर कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.