हिजबुल्लाचे मुख्यालय इस्रायलने उडविले, प्रमुख नसरल्लाही मारला गेला?

इस्रायलकडून हल्ले अधिक तीव्र

हिजबुल्लाचे मुख्यालय इस्रायलने उडविले, प्रमुख नसरल्लाही मारला गेला?

इस्रायलच्या संरक्षण दलाने (आयडीएफ) लेबेनॉनवरील हल्ले अधिक तीव्र केले असून राजधानी बैरुतवर त्यांनी केलेल्या हल्ल्यात हिजबुल्लाच्या मुख्यालयाला उद्ध्वस्त करण्यात आले आहे. यात इराणचा पाठिंबा असलेल्या हिजबुल्ला संघटनेचा प्रमुख सय्यद हसन नसरल्ला यालाही ठार मारण्यात आल्याचे कळते.
मुळात नसरल्ला हाच इस्रायलच्या केंद्रस्थानी होता. आता इस्रायलकडून नसरल्लाची हत्या झाली आहे का, याची पुष्टी अद्याप व्हायची आहे.

हिजबुल्लाने मात्र नसरल्ला जिवंत असल्याचे म्हटले आहे. शिवाय, इराणची न्यूज एजन्सी तसनीमनेही नसरल्ला जिवंत असल्याचे म्हटले आहे. पण तेहरानच्या सुरक्षा दलाचे अधिकारी हेदेखील याबाबतची खात्री पटवत आहेत.
हिजबुल्लाच्या अल मनार टेलिव्हिजनने या हल्ल्यात हिजबुल्ला मुख्यालयाच्या चार इमारती उद्ध्वस्त झाल्याचे म्हटले आहे.

हे ही वाचा:

धक्कादायक! शाळेच्या भरभराटीसाठी शाळा संचालकांनीच घेतला नरबळी

मुसलमानांनी काशी आणि मथुरा तीर्थस्थळे हिंदूंना द्यावीत

इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाहच्या हवाई दलाचा कमांडर ठार

एल्विश यादव आणि गायक फाजिलपुरिया यांची मालमत्ता जप्त!

त्यात अनेक लोक लक्ष्य झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. बैरुतच्या उत्तरेला जवळपास ३० किलोमीटरपर्यंत या स्फोटाची तीव्रता जाणवली आहे. त्यामुळे अनेक इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या असून इमारतीही डळमळीत झाल्या आहेत.
दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे अमेरिकेचा दौरा अर्धवट सोडून इस्रायलला परतले आहेत.
याआधी इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध जगाने पाहिले आहे. हमासला पूर्णपणे नामशेष करण्याचा प्रयत्न इस्रायलने केला आहे. त्यानंतर लेबेनॉनमधील हिजबुल्लाच्या सदस्यांजवळ असलेले पेजर आणि वॉकीटॉकी उडविण्यात इस्रायलला यश आले होते. त्यानंतर लेबेनॉनवर हल्ला करून इस्रायलने आपले इरादे स्पष्ट केले. त्यात ७०० लोक मृत्युमुखी पडले असून ३० हजार लोक स्थलांतरित झाले आहेत.

Exit mobile version