हमास या दहशतवादी संघटनेने ७ ऑक्टोबरला इस्रायलवर ५००० रॉकेट्स डागले, त्यांच्या नागरिकांना अपहृत केले. त्यानंतर इस्रायलने हमासचा नायनाट करण्याचा निश्चय केला आहे. परिणामी, गाझावर त्यांनी हल्ले सुरू केले आहेत. अशा एका हल्ल्यात एका पत्रकाराच्या कुटुंबाचा मृत्यू झाला आहे. गाझामध्ये इस्रायलच्या संरक्षण दलाकडून जोरदार बॉम्बवर्षाव सुरू आहे. गेल्या २४ तासांत इस्रायलने केलेल्या हल्ल्यांत शेकडो जण मारले गेले आहेत.
बुधवारी रात्री गाझामध्ये इस्रायलने केलेल्या हल्ल्यात अरब क्षेत्रातील प्रमुख वृत्तवाहिनी अल जझिराच्या पत्रकाराची पत्नी, मुलगा आणि मुलगी ठार झाले. या हल्ल्यात किमान २५ जण मारले गेल्याचा दावा पॅलिस्टिनी आरोग्य मंत्रालयाने केला आहे. इस्रायलने केलेल्या बॉम्बहल्ल्यात हे मृत्यू झाले असले तरी यासाठी हमास जबाबदार आहे, अशी प्रतिक्रिया जनमानसात उमटत आहेत.
इस्रायलच्या संरक्षण दलाकडून या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. इस्रायलने इशारा दिल्यानंतर या पत्रकाराचे कुटुंब वेल अल दहदौह या भागात आश्रयाला होते. मात्र इस्रायलने याच भागाला लक्ष्य केले, असे वृत्तामध्ये नमूद करण्यात आले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गाझा पट्टीमधील सर्व नागरिकांना दक्षिण गाझामध्ये स्थलांतरित होण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, पत्रकाराच्या कुटुंबाने शेजारी होणाऱ्या बॉम्बवर्षावामुळे नुसीरत छावणीत आसरा घेतला होता. मात्र बुधवारी रात्री इस्रायली लष्कराने मध्य गाझामधील या छावणीलाच लक्ष्य केले.
हे ही वाचा:
चेक प्रजासत्ताकमध्ये १० लाख डॉलरचा पाऊस!
कंगना रनौत अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनाला
क्रिकेटपटू दानिश कनेरियाने सांगितली, धर्मांतर, मैदानावर नमाज, पाकिस्तानमधील हिदूंची दुरवस्था
प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचे आमंत्रण हे अहोभाग्य!
निर्वासितांच्या छावणीवर बॉम्बहल्ला झाल्यानंतर ढासळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दहदौहचे कुटुंब गाडले गेले. या हल्ल्यात दहदौहच्या कुटुंबासह शेकडो जणांचा मृत्यू झाला. एका वृत्तवाहिनीने रुग्णालयात आपल्या कुटुबीयांच्या मृतदेहाला कवटाळून रडणाऱ्या दाहदौहचा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे.
इस्रायलच्या लष्कराने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत त्यांनी केलेल्या हवाई हल्ल्यात दक्षिण गाझामधील खान युनिसमध्ये हमासचा प्रमुख कमांडर तैसीर मुबाशेर मारला गेला. मुबाशेर खान युनिसमध्ये हमासच्या एका बटालियनचा प्रमुख होता. इस्रायलच्या हल्ल्यात एका दिवसात गाझा पट्टीमधील ७५६ नागरिक मारले गेल्याचा दावा केला आहे. तर, हमासने गाझा पट्टीपासून २०० किमी दूर दक्षिण इस्रायलच्या इलियट शहराच्या दिशेने एक रॉकेट डागले.