लेबेनॉनमधील हमासच्या कमांडरलाही इस्रायलने टिपले

इस्रायलच्या संरक्षण दलाने दिली अधिकृत माहिती

लेबेनॉनमधील हमासच्या कमांडरलाही इस्रायलने टिपले

इस्रायल आणि लेबनॉनमधील संघर्षाची तीव्रता वाढली असून इस्रायल सैन्याकडून सातत्याने लेबनॉनमधील हिजबुल्ला दहशतवादी गटाला लक्ष्य केले जात आहे. दुसरीकडे इस्रायलचे गाझा पट्टीतील हमासशीही युद्ध सुरू आहे. शुक्रवारी इस्रायलने लेबनॉनमध्ये हवाई हल्ला करत हिजबुल्ला संघटनेचा प्रमुख हसन नसरल्लाह याचा खात्मा केला होता. त्यानंतर आता इस्रायलने हमासच्या ठिकाणांवर हल्ला करुन हमासच्या कमांडरचा खात्मा केला आहे. फतेह शेरीफ असे त्याचे नाव असून इस्रायलच्या संरक्षण दलाने ही माहिती दिली आहे.

पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासने सांगितले की, लेबनॉनमधील त्यांचा नेता सोमवारी झालेल्या देशातील दक्षिणेकडील हल्ल्यात मारला गेला. फतेह शरीफ अबू अल-अमीन, हमासचा नेता; लेबनॉनमधील आणि परदेशात चळवळीचे नेतृत्व करणारा सदस्य दक्षिण लेबनॉनमधील अल-बास कॅम्पमधील घरावर झालेल्या हवाई हल्ल्यात ठार झाला, असे हमासच्या निवेदनात म्हटले आहे. यामध्ये त्याची पत्नी, मुलगा आणि मुलीसह तो मारला गेला असे म्हटले आहे.

हमास या दहशतवादी संघटनेतील लेबनॉन शाखेचा प्रमुख फतेह शेरीफ हा इस्रायलच्या हवाई हल्ल्यात ठार झाला. शेरीफ हा लेबनॉनमधील हमासच्या दहशतवादी कारवाया हिजबुल्लाहच्या कार्यकर्त्यांसोबत समन्वय साधण्यासाठी तसेच हमासच्या लेबनॉनमध्ये कामगारांची भरती आणि शस्त्रे मिळवण्याच्या प्रयत्नांसाठी काम करायचा. शेरीफ याच्यावर केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायली संरक्षण दलाने स्पष्टपणे सांगितले आहे की, जो कोणी इस्त्रायली नागरिकांना धोका निर्माण करेल, त्याचा खात्मा केला जाईल.

हे ही वाचा..

किमान देवांना राजकारणापासून दूर ठेवा

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर इडीकडून गुन्ह्याची शक्यता

राज्यात गायी राज्यामाता-गोमाता; पोषणासाठी मिळणार अनुदान

धारावीतील मशिदीचे अनधिकृत बांधकाम काढण्यास सुरुवात!

गाझामध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर इस्रायलने लेबनीज दहशतवादी संघटना हिजबुल्लालाही सातत्याने लक्ष्य केले आहे. याआधी जानेवारीमध्ये इस्रायलने लेबनॉनमध्ये हल्ल्यात हमास कमांडर समेर अल-हजला ठार केले होते.

Exit mobile version