इस्रायलने संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांच्या राजीनामा मागितला

संयुक्त राष्ट्राच्या प्रमुखांनी मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सामूहिक कत्तलीबाबत असंवेदनशीलता दाखवली

इस्रायलने संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांच्या राजीनामा मागितला

संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस एंटोनियो गुटेरेस यांनी मंगळवारी संयुक्त राष्ट्राच्या एका बैठकीत इस्रायल आणि हमास दरम्यान युद्धविरामाचा मुद्दा मांडला. तसेच, त्यांनी आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्यांचा आदर केला पाहिजे, असे वक्तव्य केले. या मुद्द्यावरून संतापलेल्या इस्रायलने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

 

इस्रायल आणि हमासमधील युद्धासंदर्भात मंगळवारी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत चर्चा झाली. या चर्चेदरम्यान संयुक्त राष्ट्रामधील इस्रायलचे राजदूत गिलाद एदार्न यांनी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस एंटोनियो गुटेरेस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ‘संयुक्त राष्ट्राच्या प्रमुखांनी मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सामूहिक कत्तलीबाबत असंवेदनशीलता दाखवली आहे. ते संयुक्त राष्ट्राचे प्रतिनिधीत्व करण्यास अयोग्य आहेत. त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी मी मागणी करतो. ज्या व्यक्ती इस्रायल आणि ज्यू लोकांच्या विरोधात अत्याचार करणाऱ्यांप्रति संवेदनशील आहेत, अशा व्यक्तींशी बोलण्यात काहीही अर्थ नाही. माझ्याकडे शब्दच नाहीत,’ अशी टीका इस्रायलचे संयुक्त राष्ट्रामधील राजदूत गिलाद एर्दान यांनी केली.

 

‘सद्यस्थितीत इस्रायलवर रॉकेट डागले जात आहेत आणि अशा परिस्थितीत संयुक्त राष्ट्रसंघांनी हे दाखवून दिले आहे की, ते या क्षेत्रात जे काही घडते आहे, त्याबाबत अनभिज्ञ आहेत. ते नाझी हमासच्या अत्याचाराकडे अनैतिक पद्धतीने बघत आहेत,’ असे ते म्हणाले. ‘हमासचा हा हल्ला अचानक झालेला नाही, हे गुटुरेस यांचे विधान दहशतवादाप्रति सहानुभूती देण्यासारखे आहे. हे अत्यंत दुःखद आहे की, होलोकॉस्टनंतर स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट्रासारख्या संघटनेच्या प्रमुखांचे असे भयानक विचार असू शकतात,’ असेह ते म्हणाले.

 

हे ही वाचा:

जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाला पुन्हा सुरुवात

धुळ्यात टिपू सुलतानाचा पुतळा; आमदार फारुक शाहविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी!

युएन प्रमुखांकडून इस्रायल- हमासमध्ये युद्धविराम करण्याची मागणी

पवारांची संघर्षयात्रा काय घडवणार?

संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस गुटेरेस यांनी गाझा पट्टीवर इस्रायलच्या सैन्याकडून होत असलेल्या बॉम्बस्फोटाबाबत चिंता व्यक्त केली होती. कोणताही पक्ष आंतरराष्ट्रीय मानवातावादी कायद्यांहून वरचढ नाही. गाझाची परिस्थिती दयनीय झाली आहे. तेथील नागरिक दोनवेळचे जेवण, पाणी आणि औषधांसाठी तळमळत आहेत, असे सांगून त्यांनी हमास आणि इस्रायलदरम्यान युद्धविरामाचे आवाहन केले होते.

Exit mobile version