25 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरदेश दुनियाक्रिकेट सामन्यातील विजयानंतर इस्रायलच्या राजदूतांकडून भारताचे अभिनंदन, पाकवर टीका

क्रिकेट सामन्यातील विजयानंतर इस्रायलच्या राजदूतांकडून भारताचे अभिनंदन, पाकवर टीका

एक्सवर लिहिली पोस्ट

Google News Follow

Related

विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर दमदार विजय मिळवला. भारतात याचा आनंदोत्सव साजरा होत असतानाचं यावर भारतातील इस्रायलचे राजदूत नाओर गिलॉन यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भारताचा विजय झाल्यामुळे आनंद झाल्याचे मत व्यक्त केले आहे. मात्र, सोबतच त्यांनी पाकिस्तानच्या संघावर निशाणा साधला आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर नाओर गिलॉन यांनी पोस्ट करत म्हटले आहे की, “क्रिकेट विश्वचषकामध्ये खेळल्या गेलेल्या भारत- पाकिस्तान सामन्यात भारताने विजय मिळवला याचा आम्हाला आनंद आहे. शिवाय पाकिस्तान आपला विजय हमासच्या दहशतवाद्यांना समर्पित करू शकला नाही. सामन्या दरम्यान आमच्या भारतीय मित्रांनी पोस्टर दाखवून इस्रायलशी आपली एकजूट दाखवली. यामुळे आपण खूप भावूक झालो आहोत,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

गिलॉन यांच्या पोस्टमध्ये त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती पंतप्रधान मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू या दोघांचा फोटो असलेले पोस्टर धरलेले दिसत आहे. दहशतवादाविरोधात सुरू असलेल्या युद्धात भारत इस्रायलच्या पाठीशी उभा असल्याचे पोस्टरवर लिहिले आहे.

हे ही वाचा:

अफगाणिस्तानमध्ये पुन्हा ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप

बोगस पासपोर्ट प्रकरणी सीबीआयचे ५० ठिकाणी छापे

कॅनडात तीन हिंदू मंदिरांची तोडफोड आणि चोरी

भारत पाक सामन्यात स्विगी, झोमॅटोकडून भारताला अनोख्या शुभेच्छा

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताने दमदार कामगिरीच्या जोरावर पाकिस्तानवर ७ विकेट्सनी मात केली. वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत भारताचा हा पाकिस्तानवरचा सलग आठवा विजय ठरला. पाकिस्तानचा संघ प्रथम फलंदाजी घेऊन अवघ्या १९१ धावांवर गारद झाला. त्यांच्या या धावसंख्येला भारताने सहज मागे टाकले. कर्णधार रोहित शर्माने ६३ चेंडूंत ८३ धावांची खेळी केली. या कामगिरीच्या जोरावर भारताने वर्ल्डकपमधील आपल्या सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा